अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना सरकारने विसरले --राजेंद्र मोरे

 अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना सरकारने विसरले --राजेंद्र मोरे 


 विधानसभा निवडणुकीच्या निकालात जण संशयित ठरलेल्या सरकारने आजच्या अर्थासंकल्पात शेतकऱ्यांना पूर्णपणे विसरले असल्याची टीका क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मार्गदर्शक श्री राजेंद्र मोरे यांनी केली. शेतकऱ्यांच्या नावाचा मतरुपी जोगवा मागून भुलथापा दिल्या. शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करु, सोयाबीनला 6000 रुपये भाव देऊ असं देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी जाहीरनाम्यात दाखवलेल्या स्वप्नाचे गाजर अखेर निष्फळ ठरलं असाच आजचा अर्थ संकल्प अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी सादर केला असल्याची प्रतिक्रिया श्री मोरे यांनी दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या