वांगसकर व जाधव परिवारातर्फे सावंत परिवाराचा सत्कार* ..

 *वांगसकर व जाधव परिवारातर्फे सावंत परिवाराचा सत्कार* ..



औसा प्रतिनिधी


राज्यस्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेत श्री नेताजी माणिकराव सावंत (सहशिक्षक)श्रीराम माध्यमिक विद्यालय एरंडी सारोळा ता. औसा,जि. लातूर यांनी प्रथम क्रमांक पटकावून लातूर जिल्ह्यासाठी सुवर्णपदक मिळविल्याबद्दल तसेच त्यांचे सुपुत्र अनुराग सावंत यांनी विभागीय योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी आपली निवड सिद्ध केल्याबद्दल,तसेच त्यांची सुकन्या कु.योगिता सावंत यांनी जलतरण स्पर्धेत व कराटे स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावून विभाग स्तरावर आपली निवड सिद्ध केल्याबद्दल तसेच या सर्वांच्या यशामध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्या श्री सावंत सरांच्या अर्धांगिनी सौ.रंजना सावंत यांनी सहशिक्षीका(नौकरी) पद सांभाळून दोन्ही मुलांना योग्य ते संस्कार दिल्याबद्दल श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवणी(बु)चे मुख्याध्यापक आदरणीय श्री नवनाथराव वांगस्कर सर व नृसिंह विद्यालय गोंद्री येथील सशिक्षक तथा नेताजी सावंतचे वर्गमित्र मा.श्री. अशोकराव जाधव यांनी सहपरिवार सावंत सरांच्या घरी येऊन सावंत सरांचा सपत्नीक,सहपरिवार सर्वांचाच शाल,श्रीफळ,व पुष्पहारांने यथोचित सत्कार केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या