लोहारेकर अलीजा रहेमत यांचा पहिला रोजा पूर्ण...

 लोहारेकर अलीजा रहेमत यांचा पहिला रोजा पूर्ण...





औसा प्रतिनिधी


मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेला रमजान महिनार रविवार दि.२ मार्च पासुन सुरू झाला. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा (उपवास) ठेवतात. मन व शरीर शुद्ध करण्याचा तो एक मार्ग असल्यामुळे मुस्लिम धर्मात रोजाला विशेष महत्त्व आहे. सध्या मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता वाढली आहे. औसा शहरातील नवी पेठ येथील   पाच वर्षीय चिमुकली  लोहारेकर  अलीजा  रहेमत यांनी आपल्या आयुष्यातील रमजानचा पहिला रोजा

दिनांक 5 मार्च बुधवार रोजी 

उपवास ठेवून आपल्या आयुष्यातला पहिला रोजा पूर्ण केला आहे.त्याबद्दल सर्वत्र स्तरांतून कौतुक होत आहे. आजच्या या कठीण काळातही माणसाला निरोगी व चिंतामुक्त ठेवण्याचे काम रोजा करतो. रोजा असणारा व्यक्ती दिवसभर काहीही खात नाही किंवा पाणी सुद्धा पीत नाही. सध्या उन्हाळा सुरू असल्याने रोजा धरने कठीण मानले जाते मात्र औसा शहरातील नवीपेठ येथील  कापडाचे व्यापारी व काँग्रेसचे कार्यकर्ते नियामत लोहारेकर यांची पुतणी लोहारेकर अलीजा रहेमत  या चिमुकल्यानी  आपल्या आयुष्यातील पहिला रोजा आज पूर्ण केल्याबद्दल त्यांचे लोहारेकर   परिवारात व परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या