भालकी येथील महात्मा बसवेश्वर पुतळा विटंबना घटनेचा औशात निषेध .....

 भालकी येथील महात्मा बसवेश्वर पुतळा विटंबना घटनेचा औशात निषेध .....


औसा ( प्रतिनिधी ) जगाला समतेचा संदेश देणारे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या कर्नाटक राज्यात भालकी येथील अश्वारुढ पुतळ्याची काही विघ्नसंतोषी मंडळीनी विटंबना केली . या घटनेमुळे समस्त लिंगायत  धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत .या घटनेचा विरशैव  लिंगायत समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे .औसा येथे समाजाचे अध्यक्ष सुभाष मुक्ता यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने औशाचे  तहसीलदार यांना निवेदन देऊन या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याबाबत समाजाच्या भावना कर्नाटक सरकारला कळविण्यात याव्यात असे निवेदन देण्यात आले .यावेळी  समाज बांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या