सेलू ता.औसा इथे महा सोमयाग यज्ञ सोहळ्यात सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज यांची कीर्तन सेवा संपन्न

 सेलू ता.औसा इथे 

महा सोमयाग यज्ञ सोहळ्यात

सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज यांची कीर्तन सेवा संपन्न 



औसां येथून जवळ असलेल्या 

श्रीक्षेत्र. सेलू ग्रामी कालपासून

 प. पु .गवामयन सत्र सोमयाजी

दीक्षित श्री.रंगनाथ कृष्ण सेलुकर महाराज यांच्या आधिपत्यात आरंभ झालेल्या..........    वसिष्ठ चतुरास्त्र 

महासोमयाग सोहळ्यात आज दुसऱ्या दिवशी सद्गुरु श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर 

यांची कीर्तन सेवा संपन्न झाली.


आवडे हे रूप

गोजिरे सगुण

पहाता लोचन सुखावले

आता दृष्टीपुढे ऐसा तोची राहे

जो मी तुज पाहे पांडुरंगा 

लाचावले मन लागलेसी गोडी

ते जीवे न सोडी ऐसे झाले

तुका म्हणे आम्ही मागावी लडीवाळे 

पुरवावी आळी  मायबाप


या अभंगावर सुश्राव्य अभ्यासपुर्ण 

सुंदर रसाळ मधुर कीर्तन झाले. 

सेलुकर महाराज यांच्या यज्ञ सोहळ्यात आज उपस्थित राहून याचा लाभ आशीर्वाद घेता ही आपली पुण्याईच आहे.

या कीर्तन श्रवणासाठी सेलू

बुधडा औसा, खुंटेगाव , हसेगाव

पंचक्रोशीतील हजारो लोक हजर

होते.

या यज्ञ सोहळ्यात सेलू येथील सर्व यज्ञ सोहळा संयोजन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते,व विशेषत्वाने

अड. आरविंद कुलकर्णी सेलुकर 

यांनी औसेकर महाराज यांचे स्वागत केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या