*राज्यस्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेत श्री नेताजी सावंत यांना सुवर्ण पदक*.........................................................................
......................... क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, आयुष संचालनालय , महाराष्ट्र राज्य,मुंबई,क्रीडा भारती महाराष्ट्र प्रदेश,मॉडर्न व्यायाम शाळा, व सांस्कृतिक क्रीडा मंडळ, अंबड, ता.अंबड ,जि. जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सूर्यनमस्कार शिक्षक प्रशिक्षण व स्पर्धा रथ सप्तमीनिमीत्त संपन्न झाल्या. यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक ताल्युक्यातून एक योग / क्रीडा शिक्षकांना मास्टर ट्रेनिंग देण्यात आली. त्यानंतर लगेच सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील योगगुरू श्री नेताजी माणिकराव सावंत सहशिक्षक (श्रीराम माध्यमिक विद्यालय एरंडी सारोळा, ता. औसा), तथा,पतंजली योग समिती तालुकाध्यक्ष यांनी उत्कृष्ट सूर्यनमस्कार केलेबद्दल राज्यस्तरीय प्रशिक्षक मा.श्री देवा चित्राल व आनंद चित्राल यांच्या शुभ हस्ते त्यांना जलनेती पात्र, योगा मॅट,प्रशस्तीपत्र आणि सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. या प्रशिक्षणाकरिता व स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यातून एक योगा /क्रीडा शिक्षकांना बोलावण्यात आले होते. या सत्कार प्रसंगी पंचायत समिती अंबडचे गटशिक्षणाधिकारी मा. रवी साहेब , फिरोज खान , अरुण भवर , पुरुषोत्तम सोमाणी , उदय कहाळेकर , कैलास राठी , राधा पारेख, डॉक्टर सुरेखा जाधव, प्रकाश ढेकळे , डॉक्टर मुरली जाधव, अंजली देशपांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थ्यास देवा चित्राल , आनंद चित्राल , डॉक्टर सदाशिवजी तांबे, डॉक्टर सतीश कासट, जालना आयुष विभाग सामान्य प्रशासन रुग्णालय जालना येथील डॉक्टर मनोज लोणकर, निसर्गोपचार तज्ञ डॉक्टर नारायण अंभोरे,रामप्रसाद सोळंके, भाग्यश्री पाटील , डॉक्टर मुरलीधर जाधव, डॉक्टर सतीश कासट , डॉक्टर सुरेखा जाधव यांनी निसर्गोपचार, सेंद्रिय शेती, आयुर्वेद व त्याचे महत्त्व , व्यायाम, योगा, प्रणाम, ध्यानधारणा, सूर्यनमस्कार ,आहार - विहार याबाबतीत सखोल असे मार्गदर्शन केले.हे प्रशिक्षण व स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वरील मान्यवराने परिश्रम घेतले. तसेच या स्पर्धेचे पंच म्हणून डॉक्टर मुरली जाधव, गजानन पुरी, मीनाक्षी देशमुख व आशिष बोराडे यांनी काम पाहिले व हे प्रशिक्षण व स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या.
0 टिप्पण्या