औसा शहरातील सांस्कृतिक सभागृहाची दुरुस्ती व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा - मेहराज शेख
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे व तसेच न.प. सांस्कृतीक सभागृहाची दुरुस्ती करणे तसेच तेथील सुविधा वाढविणे बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तर्फे नगरपरिषद यांना निवेदन दिले त्याचे सविस्तर वृत्त असे
औसा शहरात मोकाट कुत्रे अत्यांत जास्त प्रमाणात झालेली असून दररोज अनेकांना चावा घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यातच लहान मुलांना जास्त प्रमाणात घोका वाढलेला आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. याप्रकरणी अनेक वेळा न.प. ला सुचना देऊनही त्यावर कांही कार्यवाही करण्यात येत नाही.
तसेच औसा शहरात तहसील शेजारी सांस्कृतिक सभागृह असून या सभागृहात गोगरगरीब लोकांचे लग्न कार्य व इतर समारंभ पार पडतात. या ठिकाणी सुविधांची कमतरता आहे. तसेच इमारतीच्या पुढील बाजुचे काचे फुटलेली आहेत या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही तसेच नविन बांधलेले स्वच्छतागृह चालु केलेले नाही. आवारात स्वच्छता करण्यात येत नाही.
तरी या दोन्हीं बाबींकडे विशेष लक्ष देऊन सदरचे गंभीर प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मेहराज शेख,माजी नगराध्यक्ष, रूपेश दुधनकर माजी नगरसेवक,साजीद काझी, कृष्णा सावळकर यांच्या उपस्थितीत औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिनांक 6 जानेवारी सोमवार रोजी निवेदनाद्वारे दिला आहे.
0 टिप्पण्या