लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त उद्या पत्रकार बांधवांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन*


 *लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त उद्या पत्रकार बांधवांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन*


*लातूर/प्रतिनिधी:* लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघ व दयानंद कला महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता दयानंद कला महाविद्यालय लातूर येथे प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजीटल सह सर्व माध्यमातील उपस्थित पत्रकारांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यासाठी दर्पण दिनानिमित्त पत्रकार बांधवांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


 मराठी पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी रोजी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्यामुळे ६ जानेवारी हा महाराष्ट्रात पत्रकार दिन हा दर्पण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड व कार्यक्रमाचे उद्घाटन दिशा प्रतिष्ठान चे मार्गदर्शक अभिजीत भैय्या देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय माहिती कार्यालयाचे सहाय्यक उपसंचालक डॉ. शाम टरके, लातूर जिल्हा माहिती कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप हे उपस्थित राहणार आहेत.


         तरी या पत्रकार सन्मान सोहळ्यास लातूर जिल्ह्यातील सर्व दैनिक, साप्ताहिक, इलेक्ट्रॉनिक व डिजीटल मिडीयातील सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रविकिरण सुर्यवंशी मसलगेकर, संस्थापक सचिव दत्तात्रय परळकर, लातूर जिल्हाध्यक्ष संजय राजुळे, लातूर जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर डिगोळे, लातूर शहराध्यक्ष अमोल घायाळ यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या