अजीम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न....

 अजीम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न....


.

हिंदुस्थानी एज्यु. सोसायटी, औसाद्वारा संचलित अजीम विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन दि.28/01/2025 रोजी उत्साहात संपन्न झाले.

औसा प्रतिनिधी 

या कार्यक्रमाचे उदघाटक मा. श्री. डॉ. अफसर शेख नवाबोद्दीन साहेब (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, लातूर ग्रामीण ) तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. निजामोद्दीन शेख साहेब (मु. अ./प्राचार्य अजीम माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, औसा )आणि प्रमुख पाहुणे म्हणून श्री. जाधव साहेब (पोलीस उप निरीक्षक, औसा )सुलेमान जी शेख साहेब (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस , लातूर प्रा.), संजय कुलकर्णी सर (अध्यक्ष, हिंदुस्थानी एज्यु. सोसायटी, औसा ), श्री. मासूलदार सर (प्राचार्य -आझाद कॉलेज, औसा, श्रीमती, बालित मॅडम (प्राचार्य -B.Ed. कॉलेज ), श्री. लोहारेकर रहेमत सर (प्राचार्य -पॉलीटेक्निक कॉलेज, औसा), श्री. असीम काझी सर (प्राचार्य -फार्मसी कॉलेज ), श्री. अय्युब शेख सर, श्री. मजहर पटेल सर (प्राचार्य -D. Ed. कॉलेज ), श्री. दानिश शेख सर (पर्यवेक्षक -अजीम कॉलेज ), श्री. केसरे सर, शेख टी. एम. सर, डॉ. सिद्दीकी सर (पर्यवेक्षक )आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

उदघाटक डॉ. अफसर शेख साहेबानी अशा वार्षिक स्नेह संमेलातून विध्यार्थ्यातील सुप्त गुणांना वाव मिळतो, व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास  होण्यास मदत मिळते.

कार्यकामाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक डॉ. सिद्दीकी एम. के. व पर्यवेक्षक श्री. मेटे एस. व्ही.यांनी शाळेची होत असलेली प्रगतीसाठी  वर्षभर केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात झाली. या कार्यक्रमात देशभक्ती गीत, नाटिका, लावणी, लोकगीत,स्पोर्ट डान्स,फॅशन शो, अशा विविध गीतावर विद्यार्थ्यांनी आपले कलागुणाचे सादरीकरण करण्यात आले.

हा संपूर्ण कार्यक्रम सर्वांनाच पाहता यावा यासाठी Facebook Live करण्यात आला होता, या कार्यक्रमांस येऊ न शकणाऱ्या पालकांनी स्नेही, हितचिंतकांनी विद्यार्थ्यांचा कलाअविष्कार पाहून आनंद घेतला.

या अभूतपूर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजीम माध्य. व उच्च माध्य.मधील सर्वच शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख अ. करीम तत्तापुरे सर व विद्यार्थिनींनी खूपच बहारदार पद्धतीने केले.

मुख्याध्यापक श्री. निजामोद्दीन शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या पार पाडण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या