शेतकरी नेते राजेंद्र आबा मोरे वाढदिवसअभिष्टचिंतन सोहळा





 शेतकरी नेते राजेंद्र आबा मोरे वाढदिवसअभिष्टचिंतन सोहळा 

............................

अनाथांच्या आश्रुला आपल्या ओंजळीत हॅप्पी इंडियन व्हिलेजमधील सेवालय नवी दिशा देईल....

    

हसेगाव :समाजातील अत्यंत दुर्लक्षित अश्या एचआयव्ही संसर्गग्रस्त लेकरांसाठी हसेगाव येथील हॅपी इंडियन व्हिलेजच्या सेवालयाने त्यांच्या अश्रूसाठी आपली ओंजळ पुढे केली असून त्यांच्या जीवनातील काळ्याकुट्ट अंधाराला भेदून नवी आशा निर्माण करेल अशी आशा रिंगण लाईव्हचे संचालक राजू पाटील यांनी व्यक्त केली.

शेतकरी नेते राजेंद्रआबा मोरे यांच्या मित्र परिवाराकडून आयोजित राजेंद्र मोरे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते.

आयुष्याच्या अगदी तारूण्यात स्वर्गीय शरद जोशी यांच्या शेतकरी चळवळीत स्वतःला झोकून देत राजेंद्र मोरे यांनी जवळपास चाळीस वर्ष शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केलेला असून निराधार, निराश्रीत व्यक्तीच्या प्रश्नावर असंख्य आंदोलन केलेली आहेत. याची आठवण करुन देताना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी मागील वाढदिवसाच्या सोहळ्यास प्रत्यक्ष हजेरी लावून श्री मोरे यांच्या कार्याची थोरवी गाऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत शिवाय श्री तुपकरांचे अत्यंत विश्वासू असलेले क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते राजीव कसबे या बहाद्दूर साथीदाराची समर्थ साथ श्री राजेंद्र मोरे यांना मिळाल्याने ते शतायुषी होतील आशा श्री राजू पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. 

राजेंद्र मोरे यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने एच आय व्ही सारख्या दुर्धर आजाराशी आणि मृत्यूशी बालकांना लढण्याचे सामर्थ्य निर्माण करुन देण्याची क्षमता ज्यांनी निर्माण केली असे हसेगाव सारख्या ओसाड टेकडीवर अक्षरशः नंदनवन फुलवले त्या हॅप्पी इंडियन व्हिलेज सेवालय संचालक श्री रवी बापटले यांची थोर समाजसेक श्री बाबा आमटे यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

राजेंद्र मोरे यांनी आपल्या भाषणात उर्वरित आयुष्य समाजातील तळागाळातील लोकांसाठी खर्ची घालण्याचा मनोदय व्यक्त केला असून रवी बापटले यांनी उभा केलेले अनाथाचे कार्य जगात सर्वसश्रेष्ठ कार्य असल्याची भावना व्यक्त करताना या बालकासमवेत वाढदिवस साजरा करता येऊन त्यांच्या सोबत स्नेहभोजन करुन आनंद देता आला आणि घेता आला त्याबद्दल श्री बापटले यांचे विशेष आभार मानले.

यावेळी सर्वश्री रवी बापटले, राजू पाटील, सत्तार पटेल, अरुण दादा कुलकर्णी, नवनाथ शिंदे, राजीव कसबे, शाम जाधव, ऍड सचिन धवन पाटील, मारुती मगर, इलियास चौधरी, प्रकाश कुलकर्णी, गौतम कांबळे, राहुल गायकवाड, मारुती कसबे, प्रज्योत हुडे, शरद रामशेटे, अमर हैबतपुरे, सुरेश सूर्यवंशी, दत्ता किणीकर आणि मोरे कुटुंबीय उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या