औसा तालुक्यात दर्शवेळ अमावस्या निमित्त वनभोजनाचा आनंद लुटला..

 औसा तालुक्यात दर्शवेळ अमावस्या निमित्त वनभोजनाचा आनंद लुटला..





औसा प्रतिनिधी


 मार्गशीर्ष अमावस्या ही दर्शवेळ अमावस्या म्हणून शेतकरी बांधव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याची पद्धत आहे.यावर्षी दर्शवेळ आणि सोमवती अमावस्या असा योग जुळून आल्याने औसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेळ अमावास्येच्या सणानिमित्त शेतामध्ये वनभोजनाचा आनंद लुटला. वर्षभर काबाडकष्ट करणारा शेतकरी रब्बी हंगामामध्ये सर्वत्र हिरवीगार शेती असल्यामुळे शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये पांडव आणि लक्ष्मीची मनोभावे पूजा करून गव्हाची सडलेली खीर ,बाजरीचे उंडे आणि भाकरी विविध प्रकारच्या भाज्या मिश्रित भजी शेंगाच्या पोळ्या ,आंबील इत्यादीचा नैवेद्य दाखवितात तसेच पूजेसाठी विविध प्रकारच्या फळांची आरासही केली जाते .पूजा झाल्यानंतर पांडवासाठी कडव्याच्या पेंढ्या आणि उसाने सजवलेल्या कोपी भोवती वलगे वलगे पालम पालघे आणि लक्ष्मीचे चांगभलं अशी आराधना करीत फेऱ्या घालतात.पारंपारिक पद्धतीने पूजा झाल्यानंतर शेतकरी आपले नातेवाईक स्नेही मित्रपरिवार यांच्यासह आपापल्या शेतात निसर्ग रम्य वातावरणात वनभोजनाचा आनंद घेतात.दर्श वेळ अमावस्या निमित्त प्रत्येक शेत शिवार माणसांनी फुलून गेलेला असतो तर गावे,शहरे निर्मनुष्य दिसतात शेतशिवार आणि शेताकडील जाणाऱ्या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात दिवसभर वर्दळ सुरु होते. औसा तालुक्यामध्ये दर्शवेळ अमावस्येचा सण शेतकरी बांधवांनी अत्यंत हर्ष उल्हासामध्ये साजरा केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या