*गृहमंञी अमितशाह यांच्या राजनाम्या साठी औसा कॉग्रेस रसत्या वर...*
औसा प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी औसा शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने आयोजित आंदोलनात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो भिमसैनिका नी सहभाग घेतला.
शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून, औसा तहसिल कार्यालयापर्यंत मोटार सायकल वरून निषेध रॅली काढण्यात आली.
भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संसदेत चर्चा सुरू असताना ज्यांनी हे संविधान दिले त्या परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच संविधानिक पदावर म्हणजे केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत असलेल्या अमित शहा यांनी अवमानकारक वक्तव्य करणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे, आपल्या लोकशाही देशातील प्रत्येक नागरिकाला हीबाब कदापि सहन होणारी नाही. त्यामुळे त्यांना या पदापासून दूर करावे अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसिलदार मार्फत देशाच्या राष्ट्रपतींना पाठवलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
औसा शहरातील तक्षशिला बुध्द विहार येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन या निषेध रॉली च्या सुरवात करन्यात आले , ही रॉली शहरातील मुख्य मार्गा ने , शहरातील ईतर तिन्ही बुध्द विहारात बुध्द वंदना करुन औसा तहसिल कार्यालय येथे तहसिलदार मार्फ महामाहिम राष्ट़पती मोहद्या यांना निवेदन देऊन गृह मंञी अमित शाह यांचा राजनामा घेन्याची विनंती करन्यात आली.. व तसेच राज्या चा मुख्यमंञी यांना ही निनेदन देऊन मसाजोग ता केज जिल्हा बीड येथील शहीद सरपंच संतोष देशमुख यांच्या सर्व मारेकरी या़ना फासी व परभणी येथील शहीद भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांची पोलिस कस्टडी मध्ये झालेल्या मृत्यु ची चौकाशी करुन आपोना ना शिक्षा द्यावी असी ही मागणी औसा शहर व तालुका कॉग्रेस च्या वतीने करन्यात आली . या निवेदन वर
कॉग्रेस चे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे , प्रदेश कॉग्रेस चे सरचिटणिस अमर खानापुरे, मौलाना कलिमुल्लाह,ऑड बाबासाहेब गायकवाड, ऑड मजुंषाताई कसबे,माजी जि पी सदस्य नारायण लोंखडे, अमर भोसले, दत्तोपंत सुर्यवंशी, अजहर हाशमी, खुंदमिर मुल्ला, राजु कसबे, बालाजी सांळुके,ऑड यशवंत चौहाण, ऑड दिपक राठोड,ऑड शाहनवाज पटेल, पवन कांबळे, संजय लोंढे, अनिस जागिरदार, जयराज कसबे, व ई कार्यकर्ते च्या सही ने निवेदन देन्यात आले या वेळी शेकडो भिमसैनिक उपस्थित होते...
0 टिप्पण्या