मोगरगा येथील बांधकाम मजुराची मुलगी स्वाती चांदुरे बनली कालवा निरीक्षक......

 मोगरगा येथील बांधकाम मजुराची मुलगी स्वाती चांदुरे बनली कालवा निरीक्षक......


औसा प्रतिनिधी 

 आई-वडिलांच्या कष्टाचा पांग फेडला पोरीने ,,,एका सर्वसामान्य कुटुंबातील ,मजुराची लेक झाली कालवा निरीक्षक......



मोगरगा येथील बांधकाम मजुराच्या मुलीने जलसंपदा विभागांच्या कालवा निरीक्षकांच्या परीक्षेत यश  संपादन करीत  आपल्या बांधकाम मजुर आई वडिलांच्या कष्टांचा पांग फेडला असून बांधकाम मजुरांच्या लेकीने यशाला गवसणी   घातल्याचा आनंद औसा  तालुक्याला झाला असुन   मोगरगा येथील बांधकाम मजुर असलेले लहू चांदोरे व विजया चांदोरे यांना चार आपत्य तीन मुली व एक मुलगा यांना  गावातील जिल्हा परिषद शाळा मोगरगा येथील  केदारलिंग शाळेत  शिक्षण दिले ,मुले  शिकून मोठे व्हावीत आणि सरकारी नोकरीला लागावीत म्हणून आई-वडिलांनी शेतात आणि  बांधकामावर मजूर मनून काम केले वडिलांना चार एकर शेती आहे पण शेतात भागत नसल्याने वडिलांनी बांधकाम मिस्त्री म्हणून काम सुरू केले दोन मुलींचे विवाह करून दिले लहान मुलगी स्वाती चांदुरे ही जिद्धी व अभ्युसु वृतिची  व मुलगा विष्णू शिक्षणात चांगले हुशार  असल्याने दहावी झाल्यानंतर दोघांनाही लातूरला शिक्षणासाठी ठेवले. मुलाने एम, ए ,पर्यंत शिक्षण घेऊन मुलगा शेतात शेतीकाम करू लागला पण स्वातीने आपली जिद्द व चिकाटी सोडली नाही जलसंपदा विभागाच्या जागा निघताच स्वातीने अर्ज करून परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात स्वातीला यश  आले अन स्वाती चांदोरे  यांची नांदेड च्या जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक पदी निवड झाली ,असून लेकीने आई व आई-वडिलांच्या कष्टाचा पांग फेडला अशी  भावना मोगरगा ग्रामस्थांनी व्यक्त करीत स्वातीच अभिनंदन केला आहे यावेळी ,,

बाजार समितीचे उपसभापती चंद्रशेखर निकम ,,सरपंच रवि निकम ,उपसरपंच संभाजी मुळजे,धनराज चांदुरे ,शशिकांत सोनवने ,दिनकर जाधव ,सायमन रुब्दे ,संभाजी चांदुरे ,शिवाजी चांदुरे ,बाळु पाटील ,प्रशांत पाटील ,व्यंकट पाटील ,आजीत सोनवने ,

नानासाहेब पाटील ,चंद्रभान जाधव ,शिवाजी हंगरगे,आशोकराव सोनवने . लिंबराज माडजे,शिक्षक 

दिनकर निकम ,विक्रम सोनवने ,भगवान टोंपे,गोविंद सुर्यवंशी ,अरुन सोनवने ,

वडील लहु चांदुरे .आई विजया चांदुरे .आजी कमलाबाई चांदुरे , भाउ विष्णु चांदुरे ,संजय चांदुरे ,कालींदा चांदुरे ,प्रभाकर चांदुरे ,मनोज चांदुरे ,बंडु चांदुरे ,कालीदास चांदुरे ,बालाजी चांदुरे तानाजी चांदुरे ,सह मोगरगा ग्रामस्थांनी अभिनंदन केले .,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या