औसा मतदार संघात विकासावर पुन्हा अभिमन्यू पवार यांनी फुलविले कमळ..

 औसा मतदार संघात विकासावर पुन्हा अभिमन्यू पवार यांनी फुलविले कमळ.. 



औसा प्रतिनिधी 


२३९ औसा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांनी ही निवडणूक केवळ मतदार संघात हजारो कोटी रुपयांचा विकास निधी आणून मतदार संघातील सर्वच क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले पहिल्याच टर्म मध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी औसा विधानसभा मतदारसंघातील गेल्या अनेक वर्षापासूनचा विकासाचा रखडलेला अनुशेष भरून काढण्यासाठी रात्रंदिवस मतदार संघातील जनतेच्या अडीअडचणी सोडवून घेत शेतकरी महिला युवक व्यापारी शेतमजूर यांच्या सह सर्व जाती धर्माला सोबत घेऊन सलोख्याचे राजकारण करीत मतदारसंघातील औसा आणि कासार शिरशी परिसरातील सर्वच गावांना कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे औसा मतदार संघात


पुन्हा अभिमन्यू परवाच्या रूपाने कमळ

फुलले. औसा, लामजना, कासार शिरशी


येथील बस स्थानकाची उभारणी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय किल्लारी साखर कारखान्याचे पुनरुज्जीवन औसा शहराचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न मिटविण्यासाठी माकणी धरणातील कायमस्वरूपी पाणीपुरवठा शहरासह ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते नाले बांधकाम सांस्कृतिक सभागृह, शासकीय विश्रामगृह, बौद्ध विहार, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसराचा विकास ऐतिहासिक खरोसा लेणीचे


दुरुस्ती, भुईकोट किल्ल्याचे शास्त्रोक्त उत्खनन या योजना सह शहरात १०० खाटाचे उपजिल्हा रुग्णालय, सुसज्ज क्रीडा संकुल आणि बेलकुंड परिसरात २५० हेक्टर क्षेत्रावर होणारी एमआयडीसी अशा अनेक मुह्यावर त्यांनी काम केले. विरोधी उमेदवार च पक्षातील कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर वैयक्तिक रित्या आरोप प्रत्यारोप करून बदनाम करण्याचा केलेला प्रयत्न हाणून पाडला


आणि औसा मतदारसंघातील जनता ही विकासाच्या पाठीशीच ठामपणे उभी राहते आणि जनतेला विकास हवा आहे हेच दाखवून देत शनिवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या मतमोजणी मध्ये पहिल्या फेरी पासूनच प्रत्येक फेरीमध्ये त्यांनी आघाडी घेतली औसा शहरासह औसा तालुक्यातील गावातही त्यांना मताधिक्य मिळाले तर निलंगा तालुक्यातील कासार शिरशी परिसरातील या मतदारसंघात समाविष्ट असलेल्या बहुतांश गावातून त्यांना विक्रमी मताधिक्याची साथ मिळाली कासार शिरशी येथील अपर्थशिल कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग महावितरण कार्यालय किल्लारी अपर तहसील कार्यालयाचा मंजुरीच्या टप्प्यात असलेला प्रस्ताब तसेच किल्लारी आणि कासार शिरशी दोन तालुक्याची निर्मिती करण्यासाठी सुरू असलेले प्राणी प्रामाणिक प्रयत्न या सर्वच मुद्दधावर औसा मतदार संघातील जनतेने आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर मतदान रुपी प्रचंड आशीर्वाद देत ३३ हजारापेक्षा अधिक मताधिक्याची

विजयी झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या