संतोष सोमवंशी यांची माघार औसा येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला धिक्कार

 संतोष सोमवंशी यांची माघार औसा येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला धिक्कार


..

औसा प्रतिनिधी 

239 औसा विधानसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने उमेदवारी नाकारल्यानंतर संतोष ज्ञानोबा सोमवंशी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अधिकृत एबी फॉर्म भरून उमेदवारी दाखल केली होती परंतु नामनिर्देशन पत्र परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी दुपारी अचानक वंचित आघाडीचे संतोष सोमवंशी उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी तहसील कार्यालय जवळ माजी आमदार दिनकर माने यांच्या सोबत येताच वंचित बहुजन आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी संतोष सोमवंशी यांना धक्काबुक्की करीत तीव्र शब्दात धिक्कार केला उमेदवारी अर्ज परत घेताना तहसील कार्यालयाच्या गेट समोर शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे सुषमा अंधारे दिनकर माने आणि संतोष सोमवंशी यांचा निषेध करीत घोषणाबाजी केली वंचित बहुजन आघाडीचे संतप्त झालेले कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांच्यामध्येही गोंधळ होऊन बाचाबाची झाली वंचित आघाडी तर्फे अधिकृत उमेदवारी घेऊन उमेदवारी अर्ज परत घेतल्यामुळे ऍड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचा केलेला अपमान खपवून घेणार नाही वंचित आघाडी अंगार है बाकी सब भंगार है अशाही घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या