हसेगाव येथे सोयाबीन ची बनीम जळाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान

 हसेगाव येथे सोयाबीन ची बनीम जळाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान 


औसा प्रतिनिधी 

औसा तालुक्यातील हासेगाव येथील संजय दत्तू पाखरे या शेतकऱ्यांच्या सर्वे नंबर 136 मधील शेतामध्ये चार एकर क्षेत्रातील सोयाबीन कापणी करून काळाची बनी लावली होती सोयाबीनच्या बनमेवर चवाळे झाकून ठेवले होते मागील काळात अतिरिक्त पडलेल्या पावसामुळे आणि रस्ता नसल्यामुळे संजय पाखरे यांना मळणी यंत्र घेऊन जाता आले नाही परिणामी दिनांक 3 नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सोयाबीनची बनीम जाळल्यामुळे चार एकर 20 गुंठे क्षेत्रातील करून ठेवलेली सोयाबीनची बनीम आगीच्या बक्षीसस्थानी पडल्यामुळे गरीब शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. संजय दत्तू पाखरे यांच्या शेतातील सोयाबीन बनीम जळाल्यामुळे गावातील शेतकरी व ग्रामस्थ वर्गातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या