औसा येथे लहुजी साळवे जयंती साजरी

 औसा येथे लहुजी साळवे जयंती साजरी 


औसा प्रतिनिधी

 क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त लातूर वेस हनुमान मंदिर चौकात क्रांती वीर लहुजी साळवे आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष सुनील उटगे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करताना सर्वश्री जयराज कारंजे, संभाजी शिंदे, जालिंदर बनसोडे, आत्माराम मिरकले, राम कांबळे, अच्युत पाटील, सुरज शिंदे, सौ कल्पना डांगे, सौ माया लोंढे, धम्मदीप जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या