विधानसभेच्या ईव्हीएम मशीनचे सिलींग काम पूर्ण जिल्हाधिका-यानी व्यक्त केले समाधान

 विधानसभेच्या ईव्हीएम मशीनचे सिलींग काम पूर्ण जिल्हाधिका-यानी व्यक्त केले समाधान 


औसा प्रतिनिधी 

239 औसा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन सील करणे आणि व्हीव्हीपॅट मशीन मतदानासाठी तपासणी करून अद्यावत करणे हे काम पूर्ण झाले असून दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी औसा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधून ईव्हीएम मशीन सिलिंग चे केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत आणि आपलेही मतदान करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कोरडे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार घनश्याम अडसूळ यांच्यासह सर्व झोनल अधिकारी मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या