बेलकुंड येथे हजरत टिपू सुलतान यांची जयंती साजरी..
औसा दि. २८ (प्रतिनिधी) बेलकुंड येथे ग्राम पंचायत च्या वट्टयावर सर्व महामानवांचे फोटो ठेवून मान्यवरांच्या हस्ते फोटो ला हार घालून अभिवादन करण्यात आले
बेलकुंड (ता. औसा) येथे गुरुवारी (ता. २८) टिपू सुलतान यांची जयंती विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित समाजबांधव आणि ग्रामस्थांच्या वतीने टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून अल्पोपाहाराचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सरपंच विष्णू कोळी, अनवर शेख, सोमनाथ कांबळे, महंमद पठाण, शकील शेख, हणमंत पवार, रामकृष्ण माने, अखिल शेख, विलास तपासे, खाँजू पठाण, मुन्ना पठाण, लतीफ पठण, वसीम पठाण आदी जयंती कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या