औसा ते अलमला रस्ता बनला मृत्यूचा सापळा

 औसा ते अलमला रस्ता बनला मृत्यूचा सापळा



औसा प्रतिनिधी 


औसा ते अलमला हा 6  किलोमीटर अंतराचा रस्ता असून या रस्त्यावर औसा शहरापासून औसा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी रस्ता उघडला आहे गावानजीक असलेल्या नाल्याजवळ सिमेंट रस्ता करण्यात आला असून या सिमेंट रस्ता संपण्याच्या ठिकाणी ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर आणि बांधकाम साहित्याचे वाहतूक करणारे टिप्पर अशा अवजड वाहनामुळे मोठा खड्डा पडला आहे तसेच सुभाष देशमुख यांच्या शेताजवळ अशीच दयनीय अवस्था झाली असून सतीश नाईक यांच्या शेजारी असलेल्या संत बाळूमामा मंदिरा जवळ नागनाथ निगुडगे, शिवदास कोरे, राहुल उटगे अशा अनेक शेतकऱ्यांच्या शेताशेजारी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालकांना जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत आहेत. पावसात शहरापासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतचा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून या रस्त्यावर सतत अपघात होत आहेत सध्या साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सुरू असून डबल ट्रैली असलेले ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर्स बांधकाम साहित्याची वाहतूक करणारे टिप्पर ट्रॅक्टर शेतमालाचे नेहान करणारी वाहने आणि आलमला येथील श्री रामनाथ शिक्षण संस्था आणि विश्वेश्वर शिक्षण संस्थेच्या शिक्षण संकुलात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्कूल बसेस, जीप, टमटम आणि दुचाकी स्वार यांना या रस्त्यावरून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षण संकुलामध्ये पॉलिटेक्निक फार्मसी डी, फार्मसी फार्म डी आणि ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी स्कूल बसमधून प्रवास करतात या स्कूलबस मधून प्रवास करणारे विद्यार्थी तसेच इतर वाहन चालकांची गैरसोय टाळण्यासाठी या रस्त्याची तातडीने डागडुजी करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या