लातूरच्या आमदारकीसाठी डॉ.अर्चनाताई पाटील योग्य निवड-
डॉ.कुकडे काकांचे अर्चनाताईंना आशीर्वाद
लातूर/प्रतिनिधी:डॉ.
अर्चनाताई पाटील चाकुरकर या लातूर विधानसभेसाठी, आमदारकीसाठी योग्य उमेदवार आहेत.त्यांना निवडून द्यावे,असे आवाहन करत कुकडे काकांनी डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना आशीर्वाद दिले.
लातूर शहर मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी शुक्रवारी सकाळी डॉ. अशोकराव कुकडे काका व डॉ.ज्योत्स्नाताई कुकडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत आशीर्वाद घेतले.त्यांच्याशी संवाद साधला.भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा रागिनीताई यादव,शिरीष कुलकर्णी,माजी नगरसेविका वर्षाताई कुलकर्णी,
मीनाताई गायकवाड यांची अर्चनाताईंसमवेत उपस्थिती होती.
यावेळी ताईंना विजयासाठी आशीर्वाद देत काकांनी शुभेच्छाही दिल्या.कुकडे काका म्हणाले की,शिवराज पाटील चाकूरकर हे माझे दीर्घकाळचे मित्र आहेत.डॉ.अर्चनाताई या त्यांच्या स्नुषा असून त्या वैद्यकीय व्यवसाय करतात.लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी त्या योग्य उमेदवार आहेत.लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे.कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून डॉ.
अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना विजयी करावे ,असे आवाहन कुकडे काकांनी केले.डॉ.सौ.ज्योत्स्नाताई कुकडे यांनीही ताईंना आशीर्वाद दिले.
0 टिप्पण्या