मतदार जनजागृती साठी रॅली; मतदारांनी स्वयंस्फूर्तपणे मतदान करण्याचे आवाहन

 मतदार जनजागृती साठी रॅली; मतदारांनी स्वयंस्फूर्तपणे मतदान करण्याचे आवाहन 






.......

निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कोरडे यांच्या हस्ते राहिलेला हिरवा झेंडा 

......

औसा (प्रतिनिधी): 

239 औसा विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. सदरील राहिलेला निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कोरडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅली काढण्यात आली. 


सदरील रॅली औसा तहसील कार्यालय येथून शहराच्या मुख्य रस्त्यावरून नवीन बस स्थानकापर्यंत काढण्यात आलीआहे.  मतदार जनजागृती साठी आरोग्य विभाग, तहसील विभाग नगरपालिका प्रशासन, पंचायत समिती पोलीस विभाग यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी यांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदविला आहे. मतदान जनजागृतीच्या अनुषंगाने घोषणा देण्यात आल्या. रॅलीचा समारोप करताना निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कोरडे यांनी सर्व मतदारांनी निर्भयपणे व उत्स्फूर्तपणे मतदान करावी मतदान हा आपला हक्क असून मी मतदान करणार अशी शपथ घ्यावी आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान नवीन औसा बस स्थानक येथे स्वाक्षरी अभियानाचे फलक लावण्यात आले असून प्रत्येक नागरिकांनी मी मतदान करणार म्हणून त्यावर स्वाक्षरी करावी आणि मतदानात सहभागी व्हावे असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार घनश्याम अडसूळ यांनी केली आहे. मतदारांना आपले मतदान केंद्र ओळखण्यासाठी क्यू आर कोड ची व्यवस्था करण्यात आली असून 'आम्ही औसेकर मतदानासाठी सज्ज' अशा आशयांचे जनजागृती करण्याचे फलक अवस्था व स्थानकात लावण्यात आली आहे. सदरील रॅलीमध्ये नायब तहसीलदार घोडके गटशिक्षणाधिकारी गोविंद राठोड यांच्या सह अनेक अधिकारी कर्मचारी अंगणवाडी कार्यकर्त्या आशा कार्यकर्त्या शालेय विद्यार्थी नागरिकांनी मोठा सहभाग नोंदविला आहे. सदरील अभियान यशस्वी करण्यासाठी स्वीप पथकाचे नोडल दीपक क्षीरसागर, अविनाश जाधव, प्राध्यापक अनिल राठोड यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या