संतोष आप्पा मुक्ता यांच्या कार्यालयाचे दिवाळीच्या मुहूर्तावर भव्य उद्घाटन..

 संतोष आप्पा मुक्ता यांच्या कार्यालयाचे दिवाळीच्या मुहूर्तावर भव्य उद्घाटन..


 

औसा प्रतिनिधी 


भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्हा व औसा विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी आणि लातूर जिल्हा नियोजन विकास मंडळाचे सन्माननीय सदस्य संतोष आप्पा मुक्ता यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन औसा येथील साई चौकामध्ये दीपावली बलिप्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर आमदार अभिमन्यू पवार आणि महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष शेतकरी नेते पाशा पटेल आणि ज्येष्ठ नेते सुशीलकुमार बाजपाई यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाष आप्पा मुक्ता, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती प्रा भीमाशंकर राचट्टे ,प्रदीप मोरे, माजी नगराध्यक्ष किरण उटगे व संगमेश्वर ठेसे, शिवसेना शहर प्रमुख बंडू कोद्रे इत्यादींची उपस्थिती होती. या कार्यक्रमांमध्ये किल्लारी परिसरातील जयपाल भोसले यांच्या नेतृत्वाखाली तसेच खरोसा सर्कल मधील विशाल क्षीरसागर आणि हिप्परगा येथील दत्तात्रेय नन्नवरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वास खंबीरपणे साथ देण्याचा संकल्प केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष मुक्ता यांनी केले. भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सुभाष जाधव यांनी औसा मतदार संघाच्या विकासासाठी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले. यावेळी बोलताना आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष कोण्या एका मालकाचा नसून चालकांचा आहे त्यामुळेच निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला चांगल्या पदावर नेतृत्व करण्याची संधी प्राप्त होते त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या संकल्पनेतील अंतिम परिवारापर्यंत विकास घेऊन जात अंत्योदय करण्यासाठी कटिबद्ध आहे असे स्पष्ट केले. यावेळी बोलताना कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आमदार अभिमन्यू पवार यांना विक्रमी मताधिक्य द्या ते राज्यात मंत्री होतील आणि मतदारसंघाचा कायापालट करतील असे अभिवाचन दिले. यावेळी कासार शिष्य मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, औसा शहर मंडळाचे अध्यक्ष सुनील उटगे, कंठप्पा मुळे, ॲड अरविंद कुलकर्णी, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष काकासाहेब मोरे, आक्रम खान पठाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या