राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा विश्वास

 राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार 

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा विश्वास



लातूर दि. १७.


लातूर शहरातील कचऱ्याचा किंवा विकासकामांचा प्रश्नावर सत्ताधारी लोक विकास कामे केलेली नाहीत असा आरोप आमदार अमित देशमुख यांच्या वर जाणीवपूर्वक करत  असल्याचा आरोपाला  राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांनी लातूरला मिळणारा निधी रोखला असे सांगून विकास कामात खोडा घालणाऱ्या भाजपला पराभूत करून महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार अमित भैया देशमुख यांना विक्रमी मतांनी निवडून द्या असे आवाहन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले ते लातूर शहर विधान सभा मतदार संघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ जुना औसा रोड येथे गिरीश पाटील यांच्या निवासस्थानी मतदारांचा संवाद बैठक  बोलावली होती त्यावेळी ते बोलत होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी बसवराज वळसंगे हे होते तर व्यासपिठावर कोंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मोइज शेख, माजी आमदार अँड त्रिंबक भिसे राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील,गिरीष पाटील, रविशंकर जाधव सौ  वाडीकर श्री पाटील, संजय नीलेगावकर, गणेश एस आर देशमुख, मनोज चीखले, हरिराम कुलकर्णी बाळासाहेब देशपांडे  आदी मान्यवर उपस्थित होते.


*माझा वार्ड* *असल्याने विकास*

*कामासाठी मी कटिबध्द*

*उद्याच्या मंत्रिमंडळात आपला आमदार असेल* 


लातूर शहर हे सर्वधर्म समभाव राहिलेले शहर आहे या भागात विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार अमित देशमुख यांनी प्रयत्न केले आहेत अजून काही विषय विकासाचे प्रश्न असतील ते सोडवले जातील त्यासाठी आपण ते सोडवू मी याच भागात राहत असल्याने सर्वासाठी आशियाना बंगला कायम लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतो त्यामुळे काळजी करायची गरज नाही उद्याचे सरकार हे महाविकास आघाडीचे येणार असल्याने आपल्या भागाचे आमदार अमित देशमुख हे मंत्रिमंडळात राहणार आहेत त्यासाठी आपण आशिर्वाद देणारच आहेत पण अधिक मताधिक्य देवुन आशिर्वाद द्यावा असे आवाहन राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले आहे.


*जिल्ह्यात तरुणांना रोजगार देणारा मांजरा परिवार एकमेव*


राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून गेल्या अडीच वर्षात कुणालाही रोजगार दिला नसल्याची टीका करत लातूर जिल्ह्यात केवळ तरुणाच्या हाताला काम देणारा लातूरचा  मांजरापरिवार एकमेव आहे असे सांगून आम्ही सहकारी साखर कारखानदारी असेल किंवा जिल्हा बँक असेल इथ कधीच राजकारण जातीपातीच्या पुढे जावून काम करतोय तो विश्वास आम्ही लातुकराकडून मिळवला आहे शहरात शांतता प्रस्थापित केली कुठलीही दंगल जातीभेद याला थारा दिला नाही सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे पुढील काळात याच पद्धतीने काम करण्यासाठी अमित देशमुख शहर व ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार धीरज देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आशिर्वाद द्यावा असे आवाहन राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या