*औसेकरांच्या गावोगावी संतप्त भावनांचा महापूर*
*सुज्ञ औसेकरांचा खुला एल्गार ,*
*दिनकरराव माने पुन्हा आमदार..!*
औसा विधानसभा मतदार संघातील प्रचारार्थ सभा , बैठका , काॅर्नर सभा व भेटी गाठीचा अक्षरशः महापूर लोटलेला आहे. एकीकडे विद्यमान आमदार बंद खोलीत बसून कार्यकर्त्यांच्या खांद्यावरती ओझे देवून नियोजन करत असलेले चित्रण असताना , दुसरीकडे मात्र माजी आमदार , माजी जिल्हाध्यक्ष दिनकरराव माने साहेबांनी गावोगावी व घरोघरी सभा , बैठका , भेटीगाठी घेवून वातावरणात बदल घडवलेले चित्रण ठळकपणे दिसून येत आहे. मागील दोन दिवसांतील मतदार राजांचा कौल पाहता विद्यमान आमदार साहेब हे द्विधा व हतबल मनस्थितीत असल्याचे मतदार राजा उघडपणे बोलत आहे.
राजकीय स्वरूपातून सामाजिक वारसा लाभलेल्या औसा तालुक्याला भ्रष्टाचार रूपाने लाभलेले दिखावा रूपी नेतृत्व सहनशिलतेच्या पलीकडे गेल्याच्या भावना मतदार राजा ठळकपणे मांडत आहेत. दिवसेंदिवस गावोगावी लाभत चाललेली अफाट लक्ष्मी धोकाच देणार हा स्पष्ट निकाल गावो गावी झळकत आहे.
मागील पाच वर्षांत ३००० कोटी रूपयांचा विकास हा कागदोपत्री झळकत असताना , वास्तविक सोयाबीनचा घसरलेला दर , दुष्काळ व अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी अक्षरशः हतबल होवून विद्यमान आमदारांच्या कार्य प्रणालीमुळे वैतागलेले व चिडलेला दिसत आहे.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमान दिनकरराव माने साहेब यांनी मागील दोन वेळा केलेले नेतृत्व , सर्वसामान्य लोकांच्या अडीअडची साठी केलेले प्रयत्न व दिलेला न्याय यामुळे सामान्य शेतकरी वर्ग ठाम व निर्भिड पणे माने साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दर्शन मतदार संघामध्ये पाहण्याचे भाग्य लाभत आहे.
सामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व रूपी दिनकरराव माने साहेबांनी सर्वसमावेशक राजकारण रूपाने समाजकारण करत आले. हेवेदावे , भेदभाव न करता मतदार संघातील सर्व समावेश वर्गाला न्याय मिळवून देत , लातूर जिल्ह्यातील सुसंस्कृत व सामाजिक राजकारण्यांचा वसा पाळला , जोपासला व टिकवलेला आहे. याच सुसंस्कृत व सामाजिक वाटचालीला तडा देवून ठेकेदार व सावकार यांना हाताशी धरून गोरगरीब जनतेला लाचार करण्याचा मानस रूपी उमेदवाराला धक्कादायक निकालाने घरी बसविणे हेच औसेकरांचे तंत्र आहे व ते लागू करणार असा ठाम विश्वास जनसामान्य मतदार बोलत आहेत.
विशेषतः सोयाबीनचा रसातळाला गेलेला भाव व येत्या काळामध्ये केंद्र सरकारने नियोजन बद्ध पद्धतीने राबत असलेले हरभरा आयातीचे आत्मघातकी धोरण
यामुळे गावातील शेतकरी वर्ग हा भाजप पक्ष , नेता , उमेदवार व कार्यकर्ता यांना सवतीची वागणूक देणे बंधनकारक ठरत आहे. जाणिवपूर्वक शेतकरी वर्ग व शेती उद्योग हतबल करून शेतकरी राजाला मेटाकुटीला आणणे व भिकेला लावण्याचे षडयंत्र रचले जात असल्याच्या संदिग्ध भावनांचा पाऊस पडत आहे.
एकंदरीत सद्य परिस्थिती पाहता महाविकास आघाडीचे विद्यमान उमेदवार श्रीमान दिनकरराव माने साहेब यांचे पारडे सर्वसामान्य जनतेने , शेतकरी वर्गाने व पिडीत जनतेने भरभरून कौल देत जड केलेले आहे. देत असलेला कल पाहता मतदारांमध्ये रूपांतर करून अनपेक्षित निकाल लागणार व सुज्ञ औसेकर मतदार राजा हा आपल्या सुज्ञतेचे दर्शन पुन्हा घडवणार हे पाहण्याचे औचित्य तेवढे बाकी राहिलेले आहे.
0 टिप्पण्या