विधानसभेच्या मतमोजणीची कडे कोट बंदोबस्तात तयारी 23 फेरीत होणार मतमोजणी

 विधानसभेच्या मतमोजणीची कडे कोट बंदोबस्तात तयारी 23 फेरीत होणार मतमोजणी



औसा प्रतिनिधी 


239 औसा विधानसभा मतदारसंघाचे मतमोजणी करण्यासाठी महसूल प्रशासनाने जय्यत तयारी केली असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर आलेल्या सर्व मतदान यंत्राचे व्यवस्थित सिलिंग झाल्याची खात्री करून कडे कोट बंदोबस्तामध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. औसा विधानसभेची मतमोजणी शांतता पूर्ण वातावरणात संपन्न व्हावी यासाठी पोलीस आणि महसूल प्रशासनाने सर्वतोपरी दखल घेतली आहे.शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतमोजणी सुरुवात होणार असून एकूण 14 टेबल ची व्यवस्था मतमोजणी करता करण्यात आली असून मतमोजणीच्या एकूण 23 फेऱ्या आहेत.पोस्टल नोंदविलेले मतमोजणी करण्यासाठी पाच टेबलची व्यवस्था करण्यात आली असून सकाळी आठ वाजता सर्वप्रथम पोस्टल बॅलेट पेपरची मोजणी संपन्न होणार आहे. प्रशासनाच्या वतीने प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक एक मतमोजणी सहाय्यक व एक सूक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक उमेदवारांच्या पासधारक मतमोजणी प्रतिनिधी नाही.मतमोजणी करिता व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कोरडे यांनी दिली. विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी अत्यंत महत्त्वाची अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीमुळे तहसील कार्यालय आणि प्रशासकीय इमारतीच्या समोरील परिसरात गर्दी होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली. असून शासकीय विश्रामगृह पासून दिवाणी न्यायालयापर्यंत रस्ता ब्रॅकेट्स लावून बंद करण्यात येणार असल्याचेही कळते.विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेस नवीन बस स्थानकातून धावतील याची प्रवासी जनतेने नोंद घ्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या