जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत योगीता सावंत प्रथम -विभाग स्तरावर निवड .
....
औसा प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व लातूर जिल्हा क्रीडा कार्यालय द्वारा आयोजित जिल्हास्तरीय शोलय कराटे स्पर्धा आज जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे घेण्यात आल्या. या जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेमध्ये श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय किल्लारी येथील विद्यार्थिनी कुमारी योगिता नेताजी सावंत (11विज्ञान) या विद्यार्थ्यांनीने 19 वर्षे वयोगटातून सर्व स्पर्धकावर मात करून रोमहर्षक जीत हासील करून, प्रथम क्रमांक पटकावून नांदेड येथे होणाऱ्या विभागीय कराटे स्पर्धेत आपली निवड सिद्ध केली आहे.तरी श्री शिवछत्रपती चॅरीटेबल ट्रस्ट किल्लारी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री गुंडाप्पा बिराजदार,संस्थेचे सरचिटणीस मा श्री विजयकुमार सोनवणे, संस्थेचे कोषाध्यक्ष मा. श्री बब्रुवानजी माने,इतर सर्व संचालक, पदाधिकारी ,श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य /मुख्याध्यापक श्री शेख सलीम हुसेन , उपप्राचार्य तथा उपमुख्याध्यापक मा.श्री रामजी सूर्यवंशी, सर्व प्राध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून
क्रिडा शिक्षक प्रा. बी .एम .शिंदे सर व सहशिक्षक श्री सोनवणे, वैभव सर व अजीत ढोले सर यांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे व अचूक मार्गदर्शन केल्यामुळे कुमारी योगिता नेताजी सावंत यांची विभागीय स्तरावर कराटे स्पर्धेकरीता निवड झालेली आहे.
तिच्या या यशाबद्दल तिच्यावर सर्वत्र अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. विभागीय स्पर्धेकरीता सर्वांच्या वतीने खूप शुभेच्छा !!
0 टिप्पण्या