*मतदार माय- बापहो फक्त आशीर्वाद द्या.विजयाचा गुलाल लावूनच दिवाळी साजरी करू आणि फटाके फोडू*
शिवकुमार नागराळे अधिकृत उमेदवार औसा विधानसभा (मनसे)
औसा विधानसभा मतदारसंघासह लातूर जिल्ह्यात मा.राजसाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह मलाही मानणारा मोठा वर्ग असून मतदारसंघात शेतकरी,शेतमजूर, महिला व वृद्ध नागरिकासह सुशिक्षित बेकार युवक यावेळी मनसेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे गावोगावी भेटी दिल्यानंतर दिसून येत आहे.पक्ष स्थापनेपासूनच्या १८-२० वर्षाच्या काळात शेतकरी, शेतमजूर,निराधार,वृद्ध,महिला व विद्यार्थी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी करण्यात आलेली लक्षवेधी आंदोलने,या काळात राबवलेली विविध सामाजिक उपक्रम,वेळी -अवेळी अडचणीच्या काळात लोकांसाठी धावून गेल्याने मतदारांच्या मनात मनसेची एक वेगळी प्रतिमा तयार झाली असून.गाव भेट दौरा आणि कोपरा सभेच्या निमित्ताने गावोगावी गेल्यानंतर याचा प्रत्यय दिसून येत आहे.यावेळी मतदारसंघातील युवक,शेतकरी सामान्य जनता मनसेच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचे दिसून येत आहे.होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आज मतदारसंघातील महादेववाडी येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले शंभू महादेव मंदिरात दर्शन घेऊन किनीथोट महादेववाडी या गावी भेट देऊन मतदाराशी संवाद साधला व त्यांचे आशीर्वाद घेतले.यावेळी गावातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.याप्रसंगी मनसेचे तालुकाध्यक्ष मुकेश देशमाने, मनसेचे निष्ठावंत कार्यकर्ते महादेव कांबळे,शहराध्यक्ष प्रवीण कटारे,दीपक कांबळे, सौदागर कांबळे,प्रसाद कांबळे, प्रकाश भुजबळ,रामलिंग भुजबळ,गुरुनाथ मुळे,परमेश्वर भुजबळ,गुरुनाथ भुजबळ, ज्ञानीक भुजबळ, दत्तात्रय भुजबळ इत्यादी व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या