अक्षय धावारे यांची मराठवाडा निरीक्षण पदी निवड

 अक्षय धावारे यांची मराठवाडा निरीक्षण पदी निवड 




मुंबई प्रतिनिधी:- लक्ष्मण कांबळे


- भिम आर्मी चे संस्थापक खासदार भाई चंद्रशेखर आजाद राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंह यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अनिल भाई धेनवालजी यांनी अक्षय धावारे यांची मराठवाडा निरीक्षण पदी निवड करण्यात आली आहे महाराष्ट्रात विधान सभेचे वारे वाहू लागले आहेत येणाऱ्या विधान सभेला भिम आर्मी ची महत्वाची भुमिका असणार आहे मराठवाड्यात भिम आर्मी उमेदवारांना टक्कर देऊ शकते यासाठीच अक्षय धावारे यांची मराठवाडा निरीक्षण पदी निवड करण्यात आली आहे येणारी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून लवकरच भिम आर्मी चे राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंह  हे महाराष्ट्र दोऱ्यावर येणार आहेत या दौऱ्यात दिक्षा भूमी ते चैत्यभूमी सामाजिक न्याय याञा निघणार आहे त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंह सभेला संबोधित करणार आहेत यामुळे येणाऱ्या विधानसभेला प्रस्थापित नेत्यांना चांगलाच फटका बसणार आहे असे भिम आर्मी चे मराठवाडा निरीक्षण अक्षय धावारे यांनी आमचे प्रतिनिधी  लक्ष्मण कांबळे शी बोलताना  सांगितले आहे या निवडी बद्दल मराठवाड्यातील पदाधिकारी मित्र मंडळ  व आनेक स्तरातून अभिनंदन केले जात आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या