औसा टी पॉईंट ते भादा रोड व आलमला रोड च्या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती किंवा नवीन रस्ता तयार करा-युवक कॉग्रेसची मागणी
औसा प्रतिनिधी
सार्वजनिक बा़धकाम विभागा अंतर्गत येत असलेल्या औसा टी पॉईंट ते भादा रोड व आलमला रोड च्या विविध समस्या बाबत युवक कॉग्रेसच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग औसा सहायक अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
औसा टी पॉईंट ते बस स्टैंड औसा या आपल्या विभागाअंतर्गत येणाऱ्या दुहेरी रस्त्यावर खुप खड्डे निर्माण झालेले आहेत. त्याचे आपल्या विभागामार्फत तात्पुरती डागडुजी करण्यात येते ज्यामुळे थोड्याच दिवसात त्याची परत दुरावस्था होत आहे, तरी त्या रस्त्यांची कायमस्वरुपी दुरुस्ती किंवा नविन रस्ता तयार करण्यात यावा,
लातुर वेस वीर हनुमान मंदीर च्या पाठीमागे डॉ. आण्णाभाऊ साठे चौक, औसा येथे नुकताच तयार करण्यात आलेल्या सी.सी. रोडवर पहिल्या पावसातच खड्डे व रस्त्यालगत बांधण्यात आलेल्या नाल्यांचे छत पडले आहे. सदरील कामाची सखोल चौकशी करुन लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी.
डॉ. आण्णाभाऊ साठे चौक औसा येथे तयार केलेल्या सी.सी. रोडवर रबरी गतिरोधक बसविण्यात यावे.
भादा रोड येथिल नालीचे काम पुर्ण आहे तेथे चेंबर सोडण्यात आले आहे. परंतू येथिल खादी भांडार समोरील नालीवर चेंबर चे झाकण तयार करुनणहो अद्याप पर्यंत ते झाकण्यात आले नाही. अशा या हलगर्जीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अद्यापपर्यंत दोन चार नागरिक यामध्ये पाय अडकुन पडले आहेत. तरी सदरील झाकण लवकरात लवकर चेंबरवर ठेवण्यात यावे.
आलमला रोडवर नालीचे बांधकाम कांही ठिकाणी पुर्ण करण्यात आले नाही ते लवकरात लवकर पूर्ण करावे. नालीचा शेवट हा रस्त्याच्या कांही अंतर आगोदर करण्यात आलेला आहे. तो ओढ्यापर्यंत करावा, जेणे करुन सध्या नालीच्या बाजुस असणाऱ्या लोकांच्या प्लॉटमध्ये पाणी जाणार नाही.
तरी 15 दिवसांच्या आत वरील सर्व समस्या सोडविण्यात याव्या अन्यथा औसा युवक काँग्रेस व शहरातील नागरिकांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा सार्वजनिक बा़धकाम उपविभागाचे सहायक अभियंता यांना भारतीय युवक कॉग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत चव्हाण, उपाध्यक्ष बालाजी साळुंके, शहराध्यक्ष पवन कांबळे,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या