औशात सोयाबीन, मुग, उडीद हमीभाव नोंदणी सुरू

 औशात सोयाबीन, मुग, उडीद हमीभाव नोंदणी सुरू



औसा : येथील तालुका खरेदी विक्री संघात सोयाबीन, उडीद, मूग या पिकाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून यासाठीची नोंदणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी हमीभावाने सोयाबीन व इतर धान्य विक्रीसाठी नोंदणी करावी असे आवाहन सभापती संतोषभाऊ सोमवंशी यांनी केले आहे.

औसा तालुक्यात खरीप हंगामात शेतकर्‍यांनी 93 हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली आहे केंद्र सरकारने 2024 - 25 या वर्षासाठी सोयाबीनसाठी प्रति क्विंटल 4892 रुपये, मुग 8682 उडिद 7400 रूपये इतका हमीभाव घोषित केला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन पिकांची केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत खरेदी सुरू करण्यासाठी नाफेड अंतर्गत येथील तालुका खरेदी विक्री संघ येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात

आले आहे. त्यामुळे हमीभावाने सोयाबीन मुग उडीद खरेदी केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात हमीभावाने सोयाबीन विक्री करण्यासाठी नोंदणी सुरू आहे हमीभावाने सोयाबीन विक्री नोंदणीसाठी सातबारा उतारा, आधारकार्ड व बँकेचे पासबुक घेऊन शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन खरेदी विक्री संघाचे सभापती संतोषभाऊ सोमवंशी उपसभापती शेखर अण्णा चव्हाण आदींनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या