धर्मनिरपेक्ष पक्षांकडून मुस्लिम समाजाला महाराष्ट्र विधान सभेत जास्त जागा दया -- हाजी इर्शादभाई*

 *धर्मनिरपेक्ष पक्षांकडून मुस्लिम समाजाला महाराष्ट्र विधान सभेत जास्त जागा दया -- हाजी इर्शादभाई*


*लालू प्रसाद यादव यांची भेट घेऊन केली मागणी...*

होणाऱ्या महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणूकीत धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांकडून मुस्लिम समाजाला जास्तीत जास्त उमेदवारी देऊन निवडूण आणून समाजाच्या सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे अशी मागणी समस्त मुस्लिम जमात महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष हाजी इर्शाद भाई यांनी लालू प्रसाद यादव यांचे कडे केली आहे.

मा. केंद्रीय रेल्वे मंत्री व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची बिहार पटना येथे भेट घेऊन त्यांचेशी चर्चा करून हाजी इर्शादभाई यांनी ही मागणी केली आहे. महाराष्ट्रातील सर्व धर्मनिरपेक्ष पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून मुस्लिम समाजाला महाराष्ट्र विधान सभा निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवारी देऊन समाजाला मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची व विविध राजकिय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्याची विनंती समस्त मुस्लिम जमात महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष हाजी इर्शाद भाई यांनी बिहार चे मा. मुख्यमंत्री व मा. केंद्रीय रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांचे कडे केली आहे.

लालू प्रसाद यादव यांचेशी सकारात्मक चर्चा होऊन त्यांनी महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन  दिले असल्याची माहिती हाजी इर्शाद भाई यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या