महाराष्ट्रातून १० महिलांना उमेदवारीच्या मागणीसाठी
महिला काँग्रेस कार्यकर्त्या दिल्ली दरबारी
औसा/प्रतिनिधी -
दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होऊ घातलेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातून किमान १० महिलांना उमेदवारी देण्यात यावी या मागणीसाठी प्रदेश महिला काँग्रेसने दिल्लीचा दरबार गाठला आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये लोक संपर्कात असणाऱ्या व निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या किमान १० महिलांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करीत दिल्ली येथे प्रदेश महिला काँग्रेसने ठाण मांडले आहे. काँग्रेस पक्ष हा महिलांचा सतत सन्मान करीत आलेला पक्ष
असून श्रीमती सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील महिलांना उमेदवारी देऊन सन्मान करावा अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील महिलांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील औसा, औरंगाबाद पूर्व, अकोला, मुंबई, अंबरनाथ यवतमाळ, अशा जागासाठी महाराष्ट्र महिला कांग्रेसच्या दिल्ली दरबारी ठान मांडून बसल्या आहेत.
अखिल भारतीय महिला कांग्रेस अध्यक्षा अल्का लांबा, महिला कांग्रेस अध्यक्ष संध्याताई सवालाखे, प्रदेश उपाध्यक्ष विद्याताई पाटिल, दीपा मिसाळ, औरंगाबाद अध्यक्ष, अकोला, पूजा काळे, उज्वला साळवी मुंबई, अंबरनाथ, प्रजापति, ऊके, नागपुर आणि इतर महिलांनी विधानसभेच्या उमेदवारीसाठी दिल्ली गाठून आक्रमक भुमिका घेतली आहे.
0 टिप्पण्या