*पतंजली योग समितीच्या मार्गदर्शनामुळे अनुराग सावंत यांची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेकरीता निवड
औसा प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व लातूर जिल्हा क्रीडा कार्यालय व्दारा आयोजित विभागीय शालेय योगासने स्पर्धेत दि. 13/10/2024 रोजी क्रीडा संकुल लातूर येथे घेण्यात आलेल्या योगासन
स्पर्धेत चि. सावंत अनुराग नेताजी यांनी 17 वर्षे वयोगटातून चित्तथरारक योगासनाचे प्रात्यक्षिके सादर करून आपल्या प्रतिस्पर्धकांवर मात करून पुढील होणाऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेकरीता सलग तिसऱ्यांदा आपली निवड सिद्ध केलेली आहे. विजयाची हॅट्ट्रीक साधून
सलग तिसऱ्यांदा अनुराग विभागाचे नेतृत्त्व करीत आहे.राज्यस्तरावरही चमकदार कामगिरी करून तो राष्ट्रीय योगासन स्पर्धेत सहभागी होईल ,अशी आशा त्यांचे योग मार्गदर्शक तथा आद्य योगगुरू पतंजली योग समितीचे सर्वेसर्वा मा. श्री विष्णूजी भुतडा ,पतंजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष रामजी घाडगे,कोषाध्यक्ष प्राचार्य राजाभाऊ खंदाडे यांनी व्यक्त केली. हे यश मिळवण्यासाठी योगाचार्य मा.विष्णुजी भूतडा , मा. रामजी घाडगे, प्राचार्य राजाभाऊ खंदाडे ,आशाताई झुंजे पाटील , मा.महादेवजी झुंजे पाटील ,रामलिंगजी बिडवे,योगेश सर , सागर सर , शुभांगीताई , सरोजनीताई यांचे मार्गदर्शन मिळाले.
यावेळी पंच म्हणून धाराशिव , नांदेड व लातूर येथील तज्ञाची नियुक्ती करण्यात आली होती. स्पर्धा पार पाडण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी मा. श्री जगन्नाथजी लकडे साहेब,क्रीडा अधिकारी मा. श्री सुरेंद्रजी कराड साहेब,मा.स्वप्नीलजी मुळे साहेब ,योगा असोसिएशनचे पदाधिकारी ,पतंजली योग समितीचे पदाधिकारी ,विविध जिल्ह्यातून आलेले योगा (क्रीडा) प्रशिक्षक यांनी परिश्रम घेतले.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालययांच्या वतीने खेळाडू, क्रीडाशिक्षक व पालकासाठी उत्तम सोय व नियोजन करण्यात आलेले होते.
पतंजली योग समितीच्या अविरत परिश्रमामुळे खेळाडूंना मार्गदर्शन लाभत असून योगाची आवड व गोडी निर्माण झाल्यानेच अनुराग एक उत्तम योगासनपट्टू बनला आहे. पतंजली योग समितीच्या योगदानामुळेच अनुराग संपूर्ण विभागाचे नेतृत्व करून तो राज्यस्तरावर योगा स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यामुळे पतंजली योग समितीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या त्यांच्या यशाबद्दल पतंजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष मा. श्री रामजी घाडगे ,पतंजली योग समितीचे सर्वेसर्वा योगाचार्य मा. श्री विष्णूजी भुतडा , आशाताई झुंजे, महादेवजी झुंजे पाटील , रामलिंग बिडवे ,राजाभाऊ खंदाडे यांनी अभिनंदन केले असून
पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
राज्यस्तरीय योगा स्पर्धेकरीता निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या