मराठा आरक्षणासाठी औसा येथे कडकडीत बंद..

 मराठा आरक्षणासाठी औसा येथे  कडकडीत बंद..


औसा प्रतिनिधी

 मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज औसा तालुका यांनी सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी औसा बंदची हाक दिली होती. सकल मराठा समाजाचा हा केला उत्स्फूर्त प्रतिसाद देत औसा शहरातील व्यापाऱ्यांनी आपले सर्व व्यवहार दिवसभर कडकडीत बंद ठेवून मराठा आरक्षणाच्या बंदला पाठिंबा दिला. शहरातील सर्व प्रकारचे व्यवहार व्यापाऱ्यांनी बंद ठेवल्यामुळे काही लोकांची गैरसोय झाली आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा होत असून या आरक्षणासंदर्भात सरकारने ठोस निर्णय घ्यावा अशी अपेक्षा सकल मराठा समाज बांधवांच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे. मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदला औसा शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्पृतपणे पाठिंबा देऊन दिवसभर आपले व्यवहार बंद ठेवून आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही सोबत आहोत असे दाखवून दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या