आम आदमी पार्टीचे राम सुर्यवंशी यांच्या उपोषणस्थळी अभिमन्यू पवार यांची भेट.
औसा प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल १०,०००/- रु भाव देण्यात यावा या मागणीसाठी औसा तहसील कार्यालय समोर आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष राम वसंतराव सुर्यवंशी व बिभीषण प्रयागबाई शाहुराज कदम तालुकाउपाध्यक्ष यांनी दिनांक १७/०९/२०२४ रोजी पासून बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.या उपोषणाचा सोमवार दिनांक 23 संप्टेबर रोजी 7 वा दिवस असुन यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी आले असता यावेळी सांगितले शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 10 हजार रुपये भाव मिळावा अशी त्यांची मागणी आहे आणि आमचीही मागणी आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन भाव वाढ केली पाहिजे पण अलीकडच्या काळामध्ये गेल्या 8 दिवसांपूर्वी जे निर्णय झाला त्यामध्ये कच्च्या तेलावरचा आयात शुल्क 20 % पर्यंत आपण लादला त्याच बरोबर आपण जे आॅईल आहे रिफाईड आॅईल किंवा आपण ज्याला पामतेल म्हणतो त्याच्यावर कस्टम ड्युटी साडे बारा टक्के वरुन साडे पसतीस टक्के केली या दिनीचा परीणाम म्हणून आपल्या सोयाबीन चे भाव साधारण 5200 रुपये ते 5300 रुपये वाढलेला आहे.आणि वाढणारच आहे पण ह्यांची मागणी त्यांच्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे त्यांची आम्ही सरकारपर्यंत पोहचवू असे आ.अभिमन्यू पवार यावेळी बोलत होते.
0 टिप्पण्या