**शिवसेना-शेतकरी सेना जिल्हाप्रमुख पदी गणेशराव माडजे पाटील यांची निवड*
*.
औसा प्रतिनिधी
दिनांक 22. औसा तालुक्याचे सुपुत्र तथा हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचाराची पाईक म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून बाळासाहेब ठाकरे यांचे बाळकडू मनाशी बाळगून संघटनात्मक कार्यात आपली छाप टाकत औसा तालुका तसेच जिल्हाभर शिवसेनेची फळी तयार करण्यासाठी अहोरात्र काम करणारे लातूर जिल्हा संपर्कप्रमुख माननीय एडवोकेट. बळवंत जाधव यांचे विश्वासू गणेशराव माडजे पाटील यांची शिवसेना शेतकरी सेना लातूर जिल्हा औसा -निलंगा जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली असून आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून व त्यांनी आतापर्यंत शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य जनतेसाठी केलेले काम लक्षात ठेवून महाराष्ट्र राज्याची लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशाने व शिवसेना सचिव संजय मोरे यांनी शिवसेनेचे विभागीय संपर्क प्रमुख आनंदराव जाधव शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव शेतकरी सेना प्रमुख नाथराव कराड तथा लोकसभा प्रमुख बालाजीराव काकडे लातूर जिल्हा संपर्कप्रमुख एडवोकेट बळवंत जाधव यांच्या शिफारशीवरून लातूर जिल्हा प्रमुख पदी निष्ठावंत शिवसैनिक गणेशराव माडजे पाटील यांची निवड करण्यात आली यावेळी गणेशराव माडजे पाटील यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता शिवसेनेच्या नेत्यांनी माझ्यावर शेतकरी सेना लातूर जिल्हाप्रमुख पदाची दिलेली जबाबदारी मी निष्ठेने व पक्ष संघटना मजबूत करून आगामी निवडणुकीत योग्य प्रकारे पक्षाचे काम करणार असल्याचे सांगितले यावेळी नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याने गणेशराव माडजे पाटील यांचे जिल्हाभर अभिनंदनचा वर्षव होत आहे यावेळी लातूर शहर प्रमुख एडवोकेट प्रवेश पठाण , विजुभाऊ कांबळे, नितीन बापू महाजन, श्याम साबळे, राजू बागवान, सदाभाऊ गव्हाणे, ज्येष्ठ शिवसैनिक नवनाथ भाऊ भोसले ,विशाल माळी ,ज्ञानेश्वर व्हंताळे, गोविंद शिंदे, समाधान लोखंडे ,निलेश माडजे पाटील ,शाहरुख शेख ,सिद्धार्थ कांबळे ,तानाजी कांबळे ,बालाजी सावंत, दिगंबर कदम ,राम सूर्यवंशी ,गणेश सरवदे ,विष्णू कांबळे ,व्यंकट बिराजदार ,जगन चव्हाण ,विशाल चव्हाण ,सोहेल कारभारी , नितीन बानगुडे ,कृष्णा चव्हाण, आदित्य कसबे ,कृष्णा पवार, शिवसेना ग्राहक संरक्षण विभाग, युवासेना, युती सेना, महिला आघाडी, कामगार सेना सर्व आजी माजी पदाधिकारी शिवसेनिक यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या..
0 टिप्पण्या