चक्क बाजार समितीमधले सौदे बंद पाडा -विजयकुमार घाडगे
औसा : शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 8 हजार 500 रुपयांचा हमी भाव द्यावा व शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी बुधवार दिनांक 18 संप्टेबर रोजी औसा तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण करीत आहे.त्यांचा 10 दिवस असून येत्या दहा दिवसांपासून त्यांना प्रशासनाकडून फक्त टोलवाटोलवी चे उत्तरे मिळत आहे.सरकारचे डोकं ठिकाण्यावर आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विजयकुमार घाडगे पाटील यांनी आज उपोषणस्थळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांना मी आवाहन करतो 4892 रूपये जो हमीभाव सरकारनी दिलाय त्या हिशेबाने आपला सोयाबीन विकू नका. बाजारात जर आपल्या भावात सोयाबीन नाही घेतला तर चक्क आणि चक्क बाजार समित्या बंद पाडा.बाजरा समितीमधले जे सौदे होतात तेही बंद पाडा.एक आठवडा तरीही बाजर समित्या बंद पाडा बाजार समितीमधले सौदे बंद करा. शेवटी न्यायालयासाठी आपुणच लढले पाहिजे.राज्य सरकारने भार उचलला पाहिजे याचे डीव्हीड आहे राज्य सरकारने भार नाही उचलल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील. शेतकऱ्याला जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी येथून उठणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेऊन पत्रकार परिषदेत सांगितले . यावेळी शेतकरी नेते राजेंद्र मोरे, राजीव कसबे, भगवानराव माखणे, आदि कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या