शेतकऱ्यांना जलसमाधी घेण्याची वेळ आणणाऱ्या सत्ताधाऱ्यांना समुद्रात बुडवा -
आंदोलक राजेंद्र मोरे, राजीव कसबे
औसा :सत्तेच्या मस्तीत गुंग असलेले सरकार शेतकरी शेतमजूराचे आंदोलन दडपून टाकत आहे त्यामुळे जनतेला जलसमाधी घेण्याची वेळ आणणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीत समुद्रात बुडवू असा इशारा राजेंद्र मोरे आणि राजीव कसबे यांनी सरकारला दिला. केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असून शेतकरी विरोधी आहे.सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांचे मरण ठरले असून आज असंख्य शेतकऱ्यांनी विजयकुमार घाडगे पाटील यांच्या अमरण उपोषणाच्या समर्थनार्थ औसा येथील तलावात उड्या घेऊन जीवन संपवण्याचा संकल्प केला होता . परंतु पोलीस प्रशासनाने वेळीच सतर्क होऊन ही घटना टाळली.या देशात चळवळी आणि आंदोलन मोडण्याचा विश्व विक्रम करणारे हे सरकार असून त्यास सामान्य माणसाचं काही ही देणं घेणं उरलेलं नाही. भांडवलदार, उद्योजक, राजकारणी यांच्यासाठी काम करणारे हे सरकार आहे.देशात लोकशाही जिवंत नाही, न्यायव्यवस्था कुणाची तरी बटिक झाली असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोप पावलेलं आहे त्यामुळे शासकीय यंत्रणाचा सर्रास गैरवापर सुरु आहे.
औसा तहसील समोर शेतकऱ्याच्या सोयाबीनला 8500 रुपये भाव द्या, संपूर्ण कर्जमुक्ती करा या मागण्या घेऊन छावा संघटनेचे नेते विजयकुमार घाडगे पाटील गेल्या 18 सप्टेंबर पासून अमरण उपोषणाला बसले आहेत पोटात अन्न नाही की पाणी नाही तरी सुद्धा सरकार गंभीर नाही उलट हे आंदोलन दडपण्याचा प्रकार प्रशासनाकडून होत आहे. म्हणून जनता रस्त्यावर उतरलेली आहे. स्वंस्फूर्तीने लोक कायदा सुव्यवस्था हातात न घेता सविधानिक मार्गाने रास्ता रोको, ट्रॅक्टर रॅली, गावोगावी कॅण्डल मार्च अशी आंदोलन करुन सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असून राज्यभरातून निवेदने देऊन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा दिला जात आहे.
राजकीय दबावापोटी आंदोलनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करुन अघोषित आणीबाणी लादत आहे.
शेतकरी शेतमजूर वयोवृद्ध निराधार दिव्यांग परित्याक्ता विधवा आणि सुशिक्षित बेरोजगार यांना गावगाड्यातील प्रश्नासाठी एकत्र करुन शेतकऱ्याचा संघर्ष योद्धा रविकांत तुपकर सातत्याने सरकारला सळो की पळो करुन सोडत असून तीव्र प्रकारची आंदोलन करत आहेत त्यामुळे पोलीस बळाचा वापर करुन जेलमध्ये डांबण्याचे प्रकार सरकार करत आहे.
त्या सरकारला जनताच समुद्रात बुडवेल.
या जलसंमाधी आंदोलनात शीतल तमलवार,सुमनताई कांबळे,गंगादेवी, लिंबराज लोखंडे,हणमंत सुरवसे, पाखरे, प्रज्योत हुडे, अप्पारावहुडे, आत्माराम पाटील,शरद रामशेटे,रामेश्वर पाटवदकर महाराज, संपत गायकवाड,अप्पाराव हुडे,भुराबाई राठोड,अमोल कांबळे,रमेश तेलंग,,दत्ताभाऊ किणीकर,रावसाहेब केसरकर,दगडू बरडे,सावन गवळी,मुस्तफा देशमुख,
सुरेश सूर्यवंशी, जीवन कसबे,भीमसेन क्षीरसागर, अविनाश गायकवाड,राहुल गायकवाड, तानाजी कांबळे,लिंबराज लोखंडे,राजकुमार सस्तापुरे,शाम जाधव वाघोलीकर, अरुण दादा कुलकर्णी,सत्तार पटेल,नवनाथ शिंदे, विवेक पाटील, भरत पाटील, सुनंदा पाटील, नरशिंग पाटील,
संयोजक राजेंद्र मोरे,राजीव कसबे सहभागी होते.
0 टिप्पण्या