शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी मनसेचा कॅन्डल मार्च..

 शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी मनसेचा कॅन्डल मार्च..


औसा प्रतिनिधी 

शेतकऱ्याच्या सोयाबीनला प्रति क्विंटल ६००० हजार रुपये भाव द्यावा,इतर सर्व प्रकारचा माल हमीभावाने खरेदी करावा तसेच अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,०००/ हजार रुपयाची मदत द्यावी.या मागणी करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने औसा तालुक्यातील बिरवली येथे आज दि. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वा. "कॅन्डल मार्च" काढत आंदोलन करण्यात आले.मनसे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या "कॅन्डल मार्च" आंदोलनात शेकडो शेतकऱ्यासह मनसेचे जिल्हा सचिव धनराज गिरी,तालुकाध्यक्ष मुकेश देशमाने,विधानसभा संघटक महेश बनसोडे,तालुका संघटक राजेंद्र कांबळे,लातूर ग्रामीण विधानसभा संघटक सतीश जंगाले,तालुका सचिव जीवन जंगाले,विकास लांडगे, नवनाथ माचवे,अतिक सय्यद, अनंत भिसे,नवनाथ माचवे, युवराज आळणे,प्रवीण कठारे, समाधान फुटाणे,विवेक मावरकर,अमोल थोरात,तानाजी गरड,अनिल गुळवे,ज्ञानेश्वर गरड,नवनाथ कुंभार,देवानंद आळणे,संतोष कुंभार,नितीन गरड,धनराज चिखले इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकरी तथा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

याप्रसंगी बिरवली ग्रामपंचायत सदस्य तथा निवृत्त सैनिक बालाजी पवार यांनी अनेक सहकार्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या