*श्री ओम सिद्धिविनायक मल्टिस्टेटला राज्यातील सर्वोत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार जाहीर*
*शिर्डीमध्ये होणाऱ्या सहकार गौरव सोहळ्यात होणार सन्मान*
औसा प्रतिनिधी
लातूर, ३ सप्टेंबर २०२४: श्रीशैल्य उटगे यांच्या मार्गदर्शनाखालील श्री ओम सिद्धिविनायक मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने २०२२-२३ या वर्षातील राज्यातील सर्वोत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या प्रतिष्ठित पुरस्काराचे वितरण शिर्डी येथे होणाऱ्या सहकार गौरव सोहळ्यात करण्यात येणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष श्री सत्यम श्रीशैल्य उटगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुरस्काराचे श्रेय संस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या सभासद आणि ग्राहकांना जाते. श्री ओम सिद्धिविनायक मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची सुरवात औसा सारख्या ग्रामीण भागात केली. या भागातील लघुउद्योग व शेतकरी यांच्या समृद्ध करण्याचे कार्य केले. त्यानंतर लातुरमध्ये या संस्थेची शाखेची सुरवात केली. त्यानंतर कासार सिरसी येथे ही शाखा सुरू केली आहे. यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांना उत्कृष्ट सेवा प्रदान करून त्यांचा विश्वास संपादन केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे संस्थेच्या सेवांमध्ये सुधारणा झाली असून, ग्राहकांना तत्पर सेवा दिली जात आहे.
संस्थापक अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी सांगितले की, सहकार क्षेत्रात श्री ओम सिद्धिविनायक मल्टिस्टेट सोसायटीने केलेले कार्य प्रेरणादायी आहे. काळानुरूप बदल करत अत्याधुनिक बँकिंग सेवा प्रदान केल्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. हा सन्मान संस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व सभासद व ग्राहकांना समर्पित असल्याचे त्यांनी नमूद केले.
0 टिप्पण्या