सोयाबीनला ८५०० रुपयांचा हमी भाव द्या. या मागण्यासाठी औशात छावाचे उपोषण .

 सोयाबीनला  ८५००  रुपयांचा हमी भाव द्या. या मागण्यासाठी औशात छावाचे उपोषण .


.

औसा प्रतिनिधी 

 औसा : शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 8 हजार 500  रुपयांचा हमी भाव  द्या व शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी  या मागणीसाठी  अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी  बुधवार दिनांक 18 संप्टेबर रोजी औसा तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. 

सोयाबीन उत्पादक करणा-या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने भेदरला असतांना त्यांच्या शेतमालाला चांगला दर देऊन आधार देण्याऐवजी केंद्र सरकार त्याची कुरूर चेष्टा करीत आहे.एकरी 24 हजार रुपये खर्च येत असतांना 22 -23 हजार रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहेत.त्यामुळे सोयाबीनला प्रति क्विंटल 8 हजार 500 रूपयांचा दर द्यावा,त्याच बरोबर कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असल्याने त्याची सरसगट संपूर्ण कर्जमाफी करावी या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे  पाटील यांनी बुधवारी  दिनांक 18 संप्टेबर पासून औसा तहसील कार्यालय समोर उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत मागण्या  होत नाहीत, तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही असे घाडगे पाटील यांनी सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री  रामदास आठवले हे औसा   व किल्लारी येथील कार्यक्रमासाठी 18 संप्टेबर बुधवार रोजी  आले असता त्यांनी औसा येथे उपोषणस्थळी जाऊन छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांची भेट घेतली.शेतक-यांच्या  सोयाबीनला 8 हजार 500 रुपयांचा  हमी भाव मिळवून देण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्त्यांच्यासोबत चर्चा करून हा लवकर  मार्गी लावण्याचा  प्रयत्न करु असे आश्वासन  त्यांनी घाडगे यांना दिले.यावेळी आठवले यांनी स्व.  अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या आठवणी जागवल्या.मराठा आरक्षण तसेच दलित मराठा एकीकरणासाठी  दोघांनीही केलेले प्रयत्न  व  आठवणींना  त्यांनी यावेळी उजाळा दिला.यावेळी आ.अभिमन्यू पवार, माजी मंत्री बस्वराज पाटील व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. गुरुवार दिनांक 19 संप्टेबर रोजी उपोषणाचा दुसरा दिवस असून 

 शेतकरी, विविध संघटना, पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला आहे.या उपोषणस्थळी छावा  संघटनेचे देवकर्ण वाघ, माधवराव ताटे, संदीप ताडगे, नितीन गिरडे,भगवान माकणे, दिपक नरवडे, नितीन

सांळुके, वैभव गोमसाळे, मनोजकुमार लंगर, बाजीराव एकुर्गे, तुलसीदास सांळुके,

मारुती मुडबे, बालाजी माळी, अविनाश जंगाले, केशव पाटील, मनोज पेसाटे,रमाकांत करे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या