शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची औसा येथे उपोषणस्थळी भेट.
औसा / एम बी मणियार
औसा : शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 8 हजार 500 रुपयांचा हमी भाव द्या व शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी बुधवार दिनांक 18 संप्टेबर रोजी औसा तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
सोयाबीन उत्पादक करणा-या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी भेदरला असतांना त्यांच्या शेतमालाला चांगला दर देऊन आधार देण्याऐवजी केंद्र सरकार त्याची कुरूर चेष्टा करीत आहे.एकरी 24 हजार रुपये खर्च येत असतांना 22 -23 हजार रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहेत.त्यामुळे सोयाबीनला प्रति क्विंटल 8 हजार 500 रूपयांचा दर द्यावा,त्याच बरोबर कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असल्याने त्याची सरसगट संपूर्ण कर्जमाफी करावी या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी बुधवारी दिनांक 18 संप्टेबर पासून औसा तहसील कार्यालय समोर उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत मागण्या होत नाहीत, तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही असे घाडगे पाटील यांनी सांगत आहेत.
शनिवार दिनांक 21 संप्टेबर रोजी उपोषणाचा 4 था दिवस असून आज रोजी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.यावेळी हे दुर्दैव आहे की आमच्या शेतकऱ्याच्या सगळ्या तगड्या बॉन्ड पोरांना अजूनही भावासाठी उपोषण करावा लागतो मी सुद्धा मागच्या आठवड्यात आठवड्यामध्ये याच प्रश्नावर सिंदखेड राजाला जिजाऊ मासाहेब राजवाड्यावर मी उपोषण केले सरकारने आमच्याबरोबर चर्चा केली जो शब्द सरकारने आम्हाला दिला तो अजून पर्यंत काही पूर्ण झालेला नाही .21% कुरुर तेलावरचा आयत शुल्कच्या पलीकडे वेगळी काही भुमिका नाही. आज मला जसा कळलं घाडगे पाटील यांनी सोयाबीनसाठी उपोषणाला या ठिकाणी बसले आहेत.मी तातडीने या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी मी इथं आलो आणि यांच्या तब्येतीला जर काही बरं वाईट झालं तर फक्त याच भागातले लोक नाही तर महाराष्ट्रातला शेतकरी यांच्यासाठी रस्त्यावर उतरेल हे सरकारला ठणकावून सांगण्यासाठी याठिकाणी आलेला आहे.असे शेतकरी नेते रविकांत तुपकर या उपोषणास्थळी बोलत होते.यावेळी शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल, राजेंद्र मोरे, राजीव कसबे आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या