कर्मवीर दादासहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतून शेत जमीनी द्या:-- *लक्ष्मण कांबळे भीम आर्मी* *जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष लातूर*
औसा प्रतिनिधी:-
माननीय मुखयमंत्री एकनाथजी शिंदे साहेब
अपणाकडे सविनय अर्ज सादर
साहेब सदरील खात ही आपणाकडे आहे.मी लक्ष्मण राम कांबळे वरील ठिकाणचा भूमिहीन शेतमजुर असून माझ्या सारखे सबंध महाराष्ट्र भर भूमिहीन कुटुंब आहेत . शासन दरबारी या योजनेचा बोलबाला आहे त्याप्रमाणे या योजनेची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. भूमिहीन शेत मजुराची गाव निहाय यादी मागवून खरोखरच भूमिहीन असणाऱ्या शेतमजुरांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतून शेत जमिनीचे जशी बागायती ,किंवा जिरायती शेतजमीन उपलब्ध होतील असतील तशा जमिनीचे वाटप करण्यात यावे .या योजनेची जास्तीत जास्त ग्रामीण भागात या योजनेची जन जागृती करून शेत मजुरांना या योजनेचा फायदा मिळवून द्यावा अशी अपणकडे या ईमेल द्वारे पाठवत असलेल्या अर्जाचा विचार करावा असे भीम आर्मीचे वरिष्ठ उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी मुख्मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
0 टिप्पण्या