ईद- ए-मिलादुन्नबी निमित्त फळ वाटप..

 ईद- ए-मिलादुन्नबी निमित्त फळ वाटप..


औसा प्रतिनिधी 

संपूर्ण जगाला शांतीचा आणि एकतेचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त  औसा येथील  एम आय एम व मुस्लिम समाजाच्या वतीने व ईद -ए -मिलादुन्नबी निमित्त औसा ग्रामीण रुग्णालय येथे  आज दिनांक 16 संप्टेबर सोमवार रोजी सकाळी 11 वाजता रूग्णांना फळ वाटप करून ईद -ए -मिलादुन्नबी सण साजरा करण्यात आला.  यावेळी औसा ग्रामीण रुग्णालयाचे  डॉ.केंद्रे, डॉ .मुजाहेद शरीफ, डॉ.नारागुडे,व त्यांच्या टिमने सहकार्य केले.या कार्यक्रम प्रसंगी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांनी संपूर्ण जगाला मानवतेचा एकता व अखंडतेचा संदेश दिला.व हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी थोडक्यात माहिती दिली. यावेळी मुस्लिम समाजाचे ओबीसी तालुकाध्यक्ष डॉ वहीद कुरेशी,व एम आय एम चे कार्यकर्ते इस्माईल बागवान,मौला शेख, सय्यद शाहबाज,मोईन बागवान,हारुणखाॅ पठाण, शेख इम्रान,अजिम बागवान,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या