शिवगिरी गणेश मंडळाने आयोजित केलेले आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न
औसा (सा. वा)दि. १४
औसा शहरातील शिवगिरी गणेश मंडळ औसा व ग्रामीण रुग्णालय औसा यांच्या संयुक्त विद्यमाने (शनिवार तारीख 14) रोजी आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या आरोग्य शिबिरात जवळपास 101 नागरिकांनी आपल्या आरोग्याचे तपासणी करून घेतली तर 31 जणांनी रक्तदान करून या आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला आहे.
शिवगिरी गणेश मंडळाच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त वरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच आरोग्य शिबिरात नगर परिषदेचे सफाई कर्मचारी यांच्या आरोग्याची तपासणी व त्या कर्मचाऱ्यांचा सन्मानही यावेळी शिवगिरी गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आला.
आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. सुनिता पाटील (वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय औसा), पीएसआय कपिल पाटील (पोलीस ठाणे औसा), प्रा. काशिनाथ सगरे (अध्यक्ष तालुका पत्रकार संघ औसा), सौदागर ए एम (शहर समन्वयक स्वच्छ महाराष्ट्र अभियान नगर परिषद औसा) हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करून करण्यात आला. यावेळी शिवगिरी गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सुनिता पाटील प्रा. काशिनाथ सगरे, कपिल पाटील यांनी सखोल असे यावेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी अहोरात्र मेहनत घेतलेले शिवी गिरी गणेश मंडळातील शिवम सुनील साखरे, शुभम महारुद्र स्वामी,निखिल लक्ष्मण मेनगुळे, शुभम लक्ष्मीकांत हावळे, सिद्धेश संगय्या स्वामी, रामलिंग हनमंत देशमाने, चंद्रशेखर हनमंत देशमाने, अमोल विनायक मोरे, आदित्य भारत साखरे, अक्षय भारत साखरे, राजयोग गंगाधर ओवांडे इत्यादी जनांनी या कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन चंद्रशेखर हलमडगे यांनी केले.
0 टिप्पण्या