.
सकल मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे विविध मागणीचे निवेदन .
लातूर
सकल मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी विविध मागण्यासाठी आमरण उपोषण करण्यात येत असले बाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले .त्याचे सविस्तर वृत्त असे
सकल मुस्लिम समाजाच्या वतीने उपोषणकर्ते इलाही बशीरसाब शेख यांच्या वतीने दि. 14 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठिक 10.00 वाजल्यापासून उपोषण करण्यात येत आहे आणि त्या उपोषणामध्ये प्रमुख मागणी
मुस्लिम समाजाला उच्च न्यायालयाने मागास प्रवर्गातून 5% आरक्षण देण्याचे आदेश दिले आहे त्याचे मंत्री मंडळात प्रस्ताव पारित करुन कायद्यात रुपांतर करावे.
मुस्लिम समाजावर होणारे हल्ले (माबलिंचींग) मुळे मुस्लिम समाजाला अॅट्रोसिटी सारखा कायदा बनवून सुरक्षा द्यावी.
विशाल गड अतिक्रमणाच्या नावावर गजापूर येथे दंगल घडविणाऱ्या संभाजी राजे (माजी खासदार) कोल्हापूर व गाव गुंडावर यू.ए.पी.ए. (UAPA) कायद्यातंर्गत गुन्हे दाखल करावे.
विशाल गड अतिक्रमणाच्या नावावर गजापूर येथील नागरिकांना नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक परिवाराला 1 कोटी रुपये मावेजा आणि परिवारातील व्यक्तींना सरकारी नौकरी देण्यात यावी अशा विविध मागणीसाठी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांना निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी या निवेदनावर इलाही बशीरसाब शेख, रशीद बागवान, इरफान कुरेशी, इस्माईल बागवान, पठाण अमीर, शेख लतीफ, आसिफ,उमर,आदिच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या