औसा येथे प्रवासी राजा दिवस साजरा.

 औसा येथे प्रवासी राजा दिवस साजरा.

 


औसा प्रतिनिधी 


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने औसा येथील बस स्थानकामध्ये दिनांक 29 जुलै रोजी प्रवासी राजा दिवस साजरा करण्यात आला राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रवाशासाठीच्या सेवा सुविधा बद्दलची सविस्तर माहिती विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी उपस्थित प्रवाशांना दिली. यावेळी आघात प्रमुख शंकर स्वामी, स्थानक प्रमुख हबीब शेख, श्री मुक्तेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शरणाप्पा जलसकरे  आदी मान्यवर उपस्थित होते. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांना चांगल्या प्रकारच्या सेवा देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ कटिबद्ध असून प्रवाशांच्या तक्रारी अडचणी जाणून घेऊन त्यांचे निरसन करण्यात येईल असेही अश्वजीत जानराव यांनी यावेळी बोलताना सांगितले. राज्य परिवहन महामंडळाचा वर्धापन दिन हा प्रवासी राजा दिवस म्हणून साजरा करीत विभागीय नियंत्रक यांनी उपस्थित प्रवासी विद्यार्थी पालक यांच्यासोबत संवाद साधून प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे वाहक चालक व प्रवासी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या