औसा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सरसगट कर्ज माफ करा - कॉग्रेस कमिटीचे धरणे आंदोलन.

 औसा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सरसगट कर्ज माफ करा - कॉग्रेस कमिटीचे धरणे आंदोलन.



औसा प्रतिनिधी 


औसा तालुक्यातील शेतकऱ्याची सरसगट कर्जमाफी करणे व

 गजापुर विशालगड, कोल्हापूर येथील हिंसाचार माजविणाऱ्यावर कडक कार्यवाही करावी.या मागणीसाठी औसा तालुका कॉग्रेस कमिटिच्या वतीने औसा तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करुन औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.त्याचे सविस्तर वृत्त असे 

 भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मागील वर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे शासनाच्या वतीने औसा तालुका हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेला आहे व त्यावेळी २५% अग्रीम विमाही देण्यात आला होता. कमी पावसामुळे औसा तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडल्यामुळे व तसेच शेती ना पिकल्यामुळे औसा तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. त्यामुळे ते बँकेतून कर्ज घेतलेले आहे. तरी ज्याप्रमाणे तेलंगाना सरकारने सरसगट २ लाख पर्यंत कर्ज माफी केली आहे. त्याच धर्तीवर आपणही औसा तालुक्याचे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी.

 मागील १५ दिवसापुर्वी विशालगड किल्ल्याभोवतालच्या अतिक्रमण च्या • नावाखाली कांही असमाजीक तत्त्व यांनी विशालगड च्या पायथ्याशी चार कि.मी. लांबी असलेल्या एका मुस्लीम अल्पसंख्यांक बहुल वस्ती असलेले गजापुर येथे घरात घुसुन नासधूस केली व तसेच लाखो रुपयाचे साहित्य गाड्या वगैरेची तोडफोड करुन महिला व लहान मुलांना मारहाण केली व तसेच मस्जीदमध्ये तोडफोड करुन पवित्र कुराण ची विटंबना केली. तरी अशा असामाजीक तत्त्व ला त्वरीत आळा घालण्यासाठी या हिंसाचारात सहभाग असणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी तसेच सर्व प्रकरण हाताळण्यात असफल ठरलेल्या कोल्हापूरचे जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी.


या दोन मागण्यासाठी आज औसा तहसील कार्यालयासमोर आम्ही औसा शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करुन निवेदन सादर करीत आहोत. वरील मागण्या मान्य नाही झाल्यास येणाऱ्या काळात तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कॉग्रेस कमिटीच्या वतीने निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी  कॉग्रेस कमिटिचे शकील शेख,तालुकाध्यक्ष दत्तोपंत सुर्यवंशी, शहराध्यक्ष इंजिनिअर अजहर हाशमी, तालुका महिला अध्यक्ष सईताई गोरे, खुंदमीर मुल्ला, अँड समीयोद्दीन पटेल, अँड शाहनवाज पटेल, अँड फय्याज पटेल,सय्यद हमीद,अंगद कांबळे, जयराज कसबे,खाजा शेख,  जानीभाई शेख,अनीस जहागीरदार,जोगदंड ज्ञानोबा,  पुरुषोत्तम नलगे, सय्यद जाफर,खाजा पठाण, रिजवान अमीम सय्यद ,अनवर बागवान आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या