सोयाबीनला १०००० रु. प्रति किवटल भाव मिळावा या मागणीसाठी प्राणांतिक उपोषण
.
औसा प्रतिनिधी एम बी मणियार
औसा तालुक्यातील नागरसोगा या गावातील राम वसंत सुर्यवंशी यांनी सोयाबीन ला दहा हजार रुपये प्रतिक्विंटल ला भाव मिळावा या मागणीसाठी जूलै 5 शुक्रवार पासून प्राणांतिक उपोषणास बसले आहेत.आज त्यांचा दुसरा दिवस आहे.यासाठी त्यांनी औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. त्याचे सविस्तर वृत्त असे.
राज्यातील तमाम शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी या नात्याने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला १०००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा म्हणून औसा तहसील कार्यालय समोर दि. ५/७/२०२४ पासून बेमुदत प्राणांतिक उपोषण करीत आहेत.
गेली अनेक वर्ष देशातील शेतकरी आपल्या मागणीसाठी सातत्याने आंदोलन करीत आहे. परंतु सरकार याकडे डोळे झाक करीत आहे. भारत देश हा कृषीप्रधान असून सुद्धा येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड झालेले आहेत. शेतकरी सुखी तर जग सुखी, पण या सरकारकडून त्याची दखल नाही.
उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे त्याची झळा शेतकरी सोसतोय. मत्सवाल सरकार भांडवलदार उद्योगपतींचे चोचले पुरवण्यात मस्त आहे. आम्ही मात्र देश अडविला लावलंय याची काही त्यांना देणे घेणे नाही. आशा सुलतानी राजवटी विरोधी आज देशात शेतकरी चळवळी कार्यरत आहेत. त्याच चळवळी बळकट व्हाव्यात व शेतकयांच्या कष्टला न्याय मिळावा म्हणून माझे प्राणांतिक उपोषण कामी यावे.
त्वरित मागणी मंजूर व्हावी यासाठी औसा तहसील समोर दि.५/७/२०२४ पासून बेमुदत प्राणांतिक उपोषण करीत असून तमाम शेतकऱ्याना या चळवळीला समर्पित असेल.
0 टिप्पण्या